पुण्यात माजी नगरसेविकेवर लैंगिक अत्याचार 

 
pune crime news

पुणे : पुण्यातील एका  माजी नगरसेविकेवर एका आरोपीने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा  धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत  आरोपीने सन २०१७ पासून लैंगिक अत्याचार  केल्याची फिर्याद या नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी आरोपी सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३ वर्ष, रा. संतोषनगर कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपूर्ण संबंध होते. याच मैत्रीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो, व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने अत्याचार केला आहे.त्याचबरोबर, तुझ्या पतीला फोटो दाखवेन, अशी धमकी देत आरोपीने पीडित नगरसेविकेवर वारंवार लैंगिक अत्याचार  केला. २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून १० लाख रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती देखील पोलिस तपासात समोर आली आहे.

आरोपीने पीडित महिलेकडून २०१७ पासून १ मे २०२३ पर्यंत १० लाख रुपये घेतले. दरम्यान २ ऑक्टोबर रोजी आरोपी सचिन हा सकाळी ८ वाजता पीडित महिलेच्या घरी आला आणि 'तू दुसरे लग्न केले आहेस, तुझ्यामुळे माझी बायको मला सोडून गेली असं म्हणत पीडित महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे करत आहेत.

From Around the web