भारतात कुठे प्रसिद्ध आहे कोणती चव, जाणून घ्या या प्रसिद्ध अभिनेत्याकडून

नवी दिल्ली : भारतीय खाण्यातलं वैविध्य, विविध राज्यांतील चवी यांची जगभरात खास ओळख आहे. भारतीय संस्कृतीतल्या वैविध्याचं चवदार प्रतिबिंब भारतीय खाण्यात उमटलेलं आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारतातल्या खाण्यात चवींबाबत कायमच चढाओढ लागलेली असते. मात्र हरेक प्रांतातल्या चवींची लज्जत निराळी आहे, यात शंका नाही.
या चवींचाच माग काढत प्रसिद्ध भारतीय अभिनेता आशीष विद्यार्थी भारतभरात भटकंती करत आहेत. असंख्य रंग, रूप आणि ही चवींची यात्रा त्यांच्या चाहत्यांची दाद मिळवते आहे. यातून अनेकांना नव्या चवी चाखण्याची प्रेरणाही मिळते आहे. आशीष विद्यार्थी यांचे हे अनोखे व्हीडिओज भारताचा पहिले बहुभाषिक माइक्रो-ब्लॉगिंग मंच 'कू' वर बघायला मिळतील.
रायर्स मेसमधल्या अद्भुत मेन्यूबद्दल या व्हिडीओत विद्यार्थी बोलत आहेत.
https://www.kooapp.com/koo/ashishvidyarthi/26fb8f35-4268-4878-8bd5-2be84393aca3
आशीष विद्यार्थी यांनी कू वर अजून एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, की पटनाच्या राजस्थानी हॉटेलमध्ये कचोरी आलू आणि इमरती कमालीची गजब असते.
https://www.kooapp.com/koo/ashishvidyarthi/3e3eb55a-a6ac-41b4-a490-a47df107b925
या कू पोस्टमध्ये विद्यार्थी लिहित आहेत आंदा मार्केट, नैनीताल मधील लाजवाब पुदीना चटनीसोबत खाल्लेल्या स्वादिष्ट समोसा छोलेच्या जायक्याविषयी
https://www.kooapp.com/koo/ashishvidyarthi/0677517a-5931-4685-b53e-c98ca9cf31ee
या व्हीडिओत विद्यार्थी सांगत आहेत स्वादिष्ट खीमा आणि कलेजीच्या चवीबद्दल.
https://www.kooapp.com/koo/ashishvidyarthi/beaafd0b-61ca-4b49-a15b-64a3a4a1b33f
विद्यार्थी यांनी आणखी एक एक व्हीडिओ शेयर करत लिहिलं, की खन्ना मार्केटमध्ये आस्वाद घ्या चविष्ट राम लाडूंचा, लोधी रोड दिल्लीमध्ये देवन समोर.
https://www.kooapp.com/koo/ashishvidyarthi/9b921a65-1705-48b7-bc92-c5771b88d4de
मग, कधी पडताय बाहेर, या चवींची खुमारी अनुभवायला?