IPL : कमाल आहे या गोलंदाजाचा करिश्मा, फलंदाजांना अक्षरश: तरसावं लागतं धावांसाठी 

 
koo

मुंबई  : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15व्या सीझनमध्ये यंदा 10 संघ मैदानात उतरले आहेत. भारतीय क्रिकेटच्या मैदानाला यातून आगळीच शोभा आली आहे. क्रिकेटच्या महासंग्रामात उतरलेल्या एकाहून एक सरस खेळाडूंमध्ये एक गोलंदाज असाही दिसतोय, ज्याच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. यानं आपली शेवटची आयपीएल मॅच आजपासून 5 वर्षांपूर्वी खेळली होती, मात्र त्याचं रेकॉर्ड आजही कायम आहे. 

हा गोलंदाज कुणी दुसरा नाही, तर प्रवीण कुमार आहे. आईपीएलच्या 5 संघांचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज प्रवीण कुमारने आपला शेवटचा आईपीएल सामना गुजरात लॉयन्सच्या संघाकडून खेळली होती. त्याच्या गोलंदाजीची जादू काही अशी आहे, की आयपीएलच्या इतिहासात त्याने सर्वाधिक मेडन ओव्हर टाकलेत. खास गोष्ट ही, की प्रवीण कुमारच्या या रिकॉर्डला आजवर कुठलाच गोलंदाज तोडू शकलेला नाही. प्रवीण कुमार गेली 5 वर्ष आयपीएलपासून दूर आहे, हे विशेष.

प्रवीण कुमार खेळाबाबत बोलताना म्हणतो, की क्रिकेट पूर्णत: अनिश्चिततांचा खेळ आहे. यात चित्र बदलण्याची शक्यता हरेक क्षणी असते. कू वर पोस्ट करून प्रवीणने ही गोष्ट सांगितली. 


 

From Around the web