विराट-अनुष्का यांची ब्लू ट्राइबमध्ये गुंतवणूक

~ रोपांवर आधारित मटणाचा ब्रँड; ब्रँड अ‍ॅम्बेसेडर्सही बनले ~
 
d

मुंबई -  ब्लू ट्राइब या देशांतर्गत रोपांवर आधारित (प्लांट बेस्ड) मटणाच्या ब्रँडला भारताच्या सर्वांत मोठ्या सेलिब्रिटी पॉवर कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीमध्ये चॅम्पियन्स मिळाले आहेत. ते या ब्रँडचे गुंतवणूकदार आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून समोर आले आहेत. या ब्रँडने लोकांना आपल्या जीवनशैलीत बदल करून रोपांवर आधारित मांसाहार करण्यासाठी प्रेरित करताना सर्वप्रथम आघाडी घेतली असून त्याद्वारे पृथ्वीचा बचाव होईल, हवामान बदलाचा आणि ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करता येईल. रोपांवर आधारित मटणाच्या उत्पादनांचे प्रसारक आणि प्रचंड प्राणीप्रेमी असलेले विराट अनुष्का आपल्या आवडत्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.

अनुष्का आणि विराट हे पक्के फूडी आहेत. ते जगभरातील विविध खाद्यपदार्थांचे सेवन करतात. आपल्या प्राण्यांवरील आणि पृथ्वीच्या प्रेमामुळे त्यांनी अनेक वर्षांपासून एक विशिष्ट जीवनशैली अंगीकारली आहे. या सेलिब्रिटी जोडप्याला हे लक्षात आले की, रोपांवर आधारित मांसाहारी खाद्यपदार्थांची चव आणि पोत पारंपरिक मांसाहारी पदार्थांसारखाच आहे. त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले.

या सेलिब्रिटी जोडप्याने ब्लू ट्राइब या भारतीय वातावरणात रोपांवर आधारित मटणाच्या उत्पादनातील प्रवर्तकांसोबत भागीदारी केली असून ही कंपनी मांसाहारी पदार्थांच्या सेवनाच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांची उत्पादने प्रामुख्याने मटार, सोयाबीन, कडधान्ये, धान्ये आणि इतर शाकाहारी घटकांनी बनवलेली आहेत. त्यांना विविध प्रकारच्या रोपांवर आधारित मांसाहारी पदार्थांच्या वैविध्यपूर्णतेसाठी सकारात्मक मते व नेटिझन्सकडून प्रोत्साहनही मिळाले आहे आणि ते अधिक हरित भविष्यासाठी मोहीम चालवत आहेत.

हा उपक्रम हाती घेण्यासाठी आपल्याला कशामुळे प्रोत्साहन मिळाले याबाबत सांगताना अनुष्का शर्मा म्हणाली की, "विराट आणि मी कायमच प्राणीप्रेमी राहिलो आहोत. मागील अनेक वर्षांपासून आम्ही मांसाहारमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा निर्णय घेतला होता. ब्लू ट्राइबसोबतची आमची भागीदारी रोपांवर आधारित आहाराचे सेवन करून आपण पृथ्वीवर कशा प्रकारे कमी प्रभाव टाकू शकतो आणि लोक अधिक जागरूक होऊ शकतात हे दाखवण्यासाठी आहे. आम्हाला आशा आहे की, अधिकाधिक लोकांना त्याची गरज समजून घेणे आणि पृथ्वी तसेच येथील जीवन वाचवणे शक्य होईल.

"खरेतर मलाही विविध पदार्थ खायला खूप आवडते. परंतु मला अशा प्रकारच्या अन्नाचा आनंद घ्यायचा आहे, ज्यातून मोठा कार्बन फूटप्रिंट पृथ्वीवर सोडला जाणार नाही. मला कल्पना आहे की, अनेक लोकांनाही असेच वाटते. याच कारणामुळे मला वाटते की, आपण आपल्या आवडीनिवडींमध्ये बदल न करता मांसाहारावरील अवलंबित्व कमी करू शकलो तर पृथ्वीवर आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोठी क्षमता आहे. याच कारणामुळे ब्लू ट्राइब अत्यंत खास ठरते आहे. ते अत्यंत चविष्ट आणि पृथ्वीसाठी चांगले ठरणाऱ्या अन्नामध्ये एक संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहेत," असे विराट कोहली म्हणाले.

ब्लू ट्राइबचे सहसंस्थापक संदीप सिंग यांनी सांगितले की, “आपल्या पर्यावरणासमोरील एक खरी समस्या म्हणजे प्रत्येकाला वाटते की, पर्यावरणाचे रक्षण ही दुसऱ्या व्यक्तीची समस्या आहे! काहीही असले तरी आमची उत्पादने आपल्या आवडीच्या डिशेसबाबत चवीत कोणतीही तडजोड न करता अधिक सकस आणि पर्यावरणस्नेही उत्पादनांचे सेवन करू इच्छिणाऱ्या मांसाहारी व्यक्तींवर लक्ष केंद्रित करतात. आमचे आहारतज्ञ आणि वैज्ञानिक मटणाची विशिष्ट चव आणि पोत कशामुळे आला आहे हे शोधण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आमच्या उत्पादनांची चव, दिसणे, पोत आणि शिजवण्याची पद्धत ही मांसाहारी पदार्थांसारखीच असेल."

"भारतात ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक मांसाहारी आहेत आणि अनेक लोकांना त्याच्या पृथ्वीवरील नकारात्मक प्रभावाची माहितीही नाही. परंतु त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट अशी की, आपण काय खातो याबाबत आपण जागरूक होत आहोत आणि अनुष्का आणि विराट यांचे ब्लू ट्राइबला पाठिंबा देऊन हा संदेश प्रसारित करण्यासाठी आभारी आहोत," असे ते म्हणाले.

येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, प्रत्येक रोपावर आधारित मटणाच्या किलोमागे वातावरणात मुक्त गेला जाणारा सुमारे ६.९ किलो कार्बन डाय ऑक्साइड, १८०० लिटर पाणी वाचते आणि निरासग प्राण्यांचे जीव वाचतात. प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल घडवले आणि त्यासाठी त्यांना काहीही बदलावे लागले नाही तर रोपांवर आधारित मटणाचा काय प्रभाव पडू शकतो याची कल्पना आपण करू शकतो.

From Around the web