सोलापूरचे समाजसुधारक राजेंद्र भंडारे यांचे निधन 

तेलगू मोची आणि बौद्ध समजतील प्रखर आंबेडकरी विचाराचा दुवा हरपला
 
s

पुणे - सोलापूर येथील तेलगू मोची समाजाचे समाजसुधारक, फुले शाहू आंबेडकर विचारांचे कट्टर अनुयायी , ज्यांनी आपले सबंध आयुष्य तेलगू मोची समाजातील अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांना आंबेडकरी विचारधारेच्या माध्यमातून दूर करून शिक्षण, विज्ञान प्रज्ञा शिल करुणा या माध्यमातून  समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी मानवतावादी बुद्धिजीवी समाज निर्माण करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले असे  सोलापूर शहरातील लष्कर भागातील रहिवासी 
राजेंद्र तीमप्पा भंडारे  यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने शनिवार दि १३ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले.

       राजेंद्र तीमप्पा भंडारे  यांच्या अकाली जाण्याने केवळ मोची समजाचीच हनी झाली नसून, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त नुकसान बौद्ध समाजाचे झाले आहे कारण एक म्हण आहे की ,  सोनारनेच कान टोचलेल बर.  असे तेलगू समजतील आंबेडकरी विचारधारेचे सोनार राजेंद्र दादा होते . आपल्या समाजात तर आपण सहज काम करू शकतो . परंतु तेलगू मोची समजासारख्या मागासवर्गीय दलीत हिंदू समाजात बाबासाहेबांच्या विचारधारा पोहोचवण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम राजेंद्र दादा गेल्या चार दशकांहूनअधिक काळापासून प्रामाणिकपणे अविरतपणे करत होते.त्यामुळे त्यांच्या जाण्याने खरच बौद्ध समजाची खूप मोठी हनी झाली असून, त्यांच्या नसण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. जर खरच त्यांना आज आदरांजली , श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर ही पोकळी भरून काढण्यासाठी अखंडपणे प्रयत्नशील राहणे अत्यंत गरजेचे असून, राजेंद्र दादांनी संपूर्ण मोची समाजाचे समोर गोळा करून ठेवलेली फुले, शाहू ,आंबेडकर विचारांचे धन जर समस्त मोची बांधवांनी थोडे थोडे जरी ग्रहण केल्याचा प्रयत्न केला तरी त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे फलित संपूर्ण समाजाला मिळणार आहे.

d

   ६५ वर्षापूर्वी राजेंद्र भंडारे यांच्या जन्म सोलापूर येथे लष्कर भागातील दलीत वस्तीत झाला.लहान पणापासूनच कला आणि क्रीडाप्रेमी असलेले राजेंद्र दादा आपल्या सत्यनाम तालीम मंडळाच्या माध्यमातून शिवजयंती आंबेडकर जयंती १५ ऑगस्ट२६ जानेवारी राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात हिरारीने भाग घेऊन साजरे करताना  सामाजिक जबाबदारीही उचलत असे , मंडळाच्या देखाव्यातून समाजप्रबोधन नाटक, एकांकिका, च्या माध्यमातून ज्वलंत विषयावर भाष्य करीत असत, नंतर काही काळ त्यांनी व्यवसायिक नाटकं ही केलीत.  नंतर महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन विभागात कर्मचारी म्हणून रुजू झाले, त्यावेळी त्यांचा कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बामसेफ या संघटनेशी संपर्क आला , आणि संघटनेच्या माध्यमातून काम करताना अनेक शिबिर, अधिवेशनात ते नित्यानियमाने हजेरी लावत, बामसेफ च्या अधिवेशनातील अनेक पुस्तके ते विकत घेत आणि आश्याप्रकरे  अखंड वाचन, मनन करताना ते फुले शाहू आंबेडकरी विचारधारेकडे  वळत समाजात पूर्ण वेळ प्रबोधनाच्या महत्त्वपूर्ण कामात जुंपून गेले.

        समाजात काम करताना बांधवांच्या घरातील अडी अडचणी  ते स्वतः पुढाकार घेत सोडवित असे, मग,शिक्षणाचा, रोजगाराचा रुग्णलयाचा , कामाचा प्रश्न, इतर सामाजिक प्रश्न ते जणू काही आपल्या घरातीलच प्रश्न असल्याप्रमाणे सोडवत असतं , अश्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी ते महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून फिरले त्यातून त्यांनी तेलगू मोची समजतील प्रत्येक घराघरात भगवान बुद्ध , महात्मा फुले, शाहू महाराज , अण्णाभाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व बहुजन नायकांचे विचार पेरण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न  मृत्यूच्या शेवटपर्यंत केला . मृत्यूच्या दोनच दिवस आगोदर ते सांगली येथील जत तालुक्यात बांधलेल्या नवीन बुद्ध विहाराला भेट देऊन आले होते.

      पुण्यातील कॅम्प येथील नवा मोदीखाना या ब्रिटिशांच्या छावणीतील त्यांची सासरवाडी त्यांची पत्नी येथील भोसले घराण्याच्या  आणि त्यामुळे त्यांचा पुण्याशी संपर्क आला . नवा मोदीखाण्यातील  सिद्धार्थ तरुण मंडळाने २००३ साली आयोजित केलेल्या ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत  भिमकवी बलन्ना सैदन्ना निमल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या ध्वज स्तंभाचे अनावर खासदार रामदास आठवले यांनी केले होते त्याप्रसंगी वह्या वाटप कार्यक्रमच आयोजन तत्कालीन सिद्धार्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते त्यावेळी तेलगू मोची समाजातील सोलापूर येथील धडाडीचे कार्यकर्ते आणि मोदीखाण्याचे जावई राजेंद्र भंडारे  यांनी निमंत्रण देण्यात आले, ते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्यावेळी त्यांनी  दिवंगत भिमकवी बलन्ना सैदन्ना निमल यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान, महाड येथील चवदार तळे सत्याग्रहासाठी मोदीखाण्यातून ७५ महार कार्यकर्त्यांना सायकल वर घेऊन गेल्याची घटना, बाबासाहेबांचे विचार आपल्या चुडी गीतातून गावोगावी पोहचवण्याचे काम वामनदादा कर्डक या भीम गितकारांशी असलेला  घनिष्ट संबंध, आणि भिमकवी बलन्ना सैदन्ना निमल  यांनी अखंड कॅम्प भागात केलेलं अतुलनीय सामाजिक कार्य  आणि शेवटी त्यांच्या स्वइच्छा नुसार बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर झालेला अंत्यविधी  यांच्याविषयी त्यांचे चेले, कार्यकर्ते  प्रसिद्ध चित्रकार  दिवंगत सुधीर वाघमारे यांच्याकडून माहिती घेतली आणि मग बस्स राजेंद्र दादांना समाजात काम करताना वेगळीच दिशा घावली, त्यानंतर त्यांनी सोलापुरात जाऊन भिमकवी बलन्ना सैदन्ना निमल यांच्या नावाने चौक स्थापन केला आणि त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केल्याची सुरुवात थोर समाजसेवक राजेंद्र दादा भंडारे यांनी केली. त्याअगोदर त्यांनी सोलापूर येथील सत्यानाम तालीम संघात लष्कर मध्यवर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाची स्थापना ३५ वर्षापूर्वीच केली होती. त्यातून आजही अविरत डॉ बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे, याचा मान राजेंद्र दादांना जातो.

     राजेंद्र दादांनी संपूर्ण महाराष्ट्रभर खेडो पाडी जाऊन तेलगू मोची समाजातील युवकांची बांधणी करून त्यांना फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेखाली एकत्र आणण्याचे मोलाचे काम केले आहे. केवळ राजकारणात अडकून न राहता चांगला समाज घडवण्यासाठी  समाजकार्य केले पाहिजे, समाजबांधवांच्या अडी-अडचणी सोडवल्या पाहिजे, आपला एकच मुक्तीदाता आहे ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहलेले संविधानामुळेच आज आपली प्रगती आहे, आणि जर आपल्याला शिक्षणासह सर्व क्षेत्रात प्रगती करायची असेल तर बुद्ध तत्वज्ञान आणि आंबेडकर वादाशिवाय पर्यायच नाही अशी त्यांची शिकवण होती .
 परडी परंपरेला दादांनी आळा घातला   सोलापूर येथील मोची समजतील स्त्रिया पिढ्यानपिढ्या परडी परंपरा पाळत होत्या गेल्या तीस वर्षांपासून दादांनी परडी परंपरा बंद झाली पाहिजे यासाठी पुढाकार घेतला आणि प्रत्यक्ष समाजात काम केले, वेळप्रसंगी त्यांनी समाजातील लोकांचा अपमानही सहन केला मात्र बाबासाहेबांच्या विचाराने पेटलेल्या हा माणूस आपल्या निर्णयावर ठाम राहिला त्यामुळे सोलापुरात आज परडी परंपरा अतिशय कमी झाली असून याच श्रेय फक्त राजेंद्र दादांना जाते.

      कॅम्प भागातील प्रसिध्द चित्रकार आणि त्यांचे मित्र सुधीर वाघमारे यांच्या यांच्या पुण्यानुमोदन दिनात आयोजित शोकसभेत राजेंद्र दादा यांनी श्रद्धांजली वाहताना एक खंत म्हणून दाखवली होती ते म्हणले होते की, चवदार तळे सत्याग्रहाला लष्कर भागातून थोर समाजसेवक बालन्ना सैदन्ना निमल सोबत सायकलीवर गेलेल्या ७५ महार बांधवांमध्ये जर केवळ ५ तेलगू मोची समाजाचे बांधव असते तर महाराष्ट्रातील तमाम तेलगू मोची समाजाची स्थिती आजच्या बौद्ध समजासारखी मजबूत असली असती .

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विकास आढाव यांचा आणि राजेंद्र दादांचा एकदाच चित्रकार वाघमारे यांच्या शोकसभेत संबंध आला होता त्यांनी त्यावेळी केलेल्या ३ मिनिटाच्या भाषणाने आढाव सर यांनी राजेंद्र दादांना विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले होते आणि ते करत असलेल्या कर्या बद्दल कौतुक केले होते , नंतर राजेंद्र दादांनी ही आढाव सरांना सोलापूर येथे कार्यक्रमासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते, परंतु कार्यक्रम ठरण्याधीच काळाने त्यांच्यावर घाव घातला.

राजेंद्र दादा यांचे बंधू हे सोलापूर महापालिकेचे तीन टर्म नगरसेवक होते. तर राजेंद्र दादांच्या पाठीमागे त्यांची पत्नी तीन मुले एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा तर आर्मी च्या बी एस एफ च्या तुकडीत देशसेवा करतोय तर इतर दोन मुले हे व्यवसाय करतात. राजेंद्र दादांच्या इच्छेनुसार त्यांचा अंत्यविधी हा बौद्ध संस्कार पद्धतीने झाला, यावेळी त्यांचे तिन्हीही मुलांनी जय भीम बाबा जय भीम आसा हंबरडा फोडत दादांना क्रांतिकारी जय भीम घातला परंतु, दादा लवकरच आपल्या परिवारासोबत बुद्ध धम स्वीकारणार होते दादांच्या अकाली मृत्यूने त्यांचे बौद्ध धम्मा स्विकाण्याचे शेवटचे स्वप्न अपूर्णच राहिले.

From Around the web