सांगोलाच्या दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असाह्य आजारांवर यशस्वी उपचार

दुर्मिळ आजाराने पिडीतांसाठी वरदान
 
s

सांगोला - लहानपणी एखाद्या अवयवाला दुखापत झाल्यानंतर तो अवयव वाकडा होतो. मात्र यामुळे मोठेपणी त्या रुग्णाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे हाताची बोटे किंवा पायाची बोटे एकत्र न येणे, मुठ आवळता न येणे किंवा बोटे वळविता न येणे तसेच हातामध्ये कोणतीच वस्तू पकडता न येणे या आजारास शास्त्रीय भाषेत टार्डी अल्नार न्युरोपथी असे संबोधतात.


टार्डी अल्नार न्युरोपथी असा आजार एक हजारामध्ये एखाद्या व्यक्तीला असू शकतो किंवा उद्भवू शकतो. या आजाराचे रुग्ण भारतात क्वचितच आढळतात. त्यामुळे यावर उपचार करणारे वैद्यकीय तज्ञ असलेले डॉक्टर देखील दुर्मिळच आहेत. मात्र विज्ञान युगामध्ये वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी दररोज संशोधन होत असल्यामुळे अशा आजारावर उपचार होऊ लागले आहेत. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील पांडुरंग ज्ञानेश्वर जाधव (वय ३४ वर्षे) यांना २ वर्षांपूर्वी त्यांच्या उजव्या हाताला व पाठीला वजनदार वस्तू उचलताना चमक मारली. त्याला आपण करत भरली असे म्हणतो. त्यानंतर त्याच्या उजव्या हाताला मुंग्या येऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी जवळील डॉक्टरांना दाखविले. तर डॉक्टरांनी तपासणी करून पेन किलर (वेदनाशमन) च्या गोळ्या दिल्या. मात्र त्याने कसलाच व कोणताही फरक पडला नाही. 

नंतर ते वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार करू लागले. वेगवेगळ्या डॉक्टरांनी एमआरआय काढून तपासणी केली. मात्र एमआरआयमध्ये काहीही दोष काढून आला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. च्या गोळ्या मी नियमित सेवन केल्या. मात्र कोणताही फरक न पडल्यामुळे तो त्रास आणखी वाढला. त्यानंतर हाडाच्या डॉक्टरांशी भेटल्यावर त्यांनीही हा उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च सांगितला होता. त्यामुळे ते इलाजाविनाच खीतपत पडले होते. 

याच दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील डॉ. सुदीप चव्हाण यांनी त्या रुग्णाची तपासणी करून त्याचा अभ्यास केला. अभ्यासाअंती त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियामध्ये कोपरावर असलेली रक्तवाहिनी (नस) दबलेली मोकळी केली. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जण आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करून त्या रुग्णाला व त्याच्या नातेवाईकाला आरोग्यदायी दिलासा दिला आहे. त्यामुळे अशाप्रकारे आजार असणाऱ्या रुग्णांनी कोणत्याही प्रकारची महागडी शस्त्रक्रिया न करता या डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य व माफक दरात मात्र जीवनावश्यक असलेला उपचार करून घेणे हिताचे ठरणार आहे.

From Around the web