"एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजने”च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जव्हार मधील सर्व अंगणवाड्या दत्तक घेणार

पुढील काळात जव्हार मधील आदिवासी महिला व बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी समर्थन सोबत काम करणार
 
as
- आदिवासी प्रकल्प अधिकारी, जव्हार श्रीम. आयुषी सिंग

ठाणे - आज दि. १० ॲागस्ट, २०२२ रोजी प्रकल्प अधिकारी(PO), जव्हार श्रीम. आयुषी सिंग यांच्या जव्हार येथील कार्यालयात त्यांच्या निमंत्रणावरून समर्थनच्या प्रतिनिधी स्नेहा घरत, निलम काकड व बाल संजिवन छावणीच्या कार्यवाह सीता घाटाल यांनी भेट घेतली व महिला व बालकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. 

‘ए.पी.जे. अमृत आहार योजने’चा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला व्हावा त्याच बरोबर या योजनेचे सनियंत्रण (Monitoring) प्रभावी व्हावे यावर आपण भर देणार असून; जव्हार मधील सर्व अंगणवाड्या दत्तक घेऊन पथदर्शी प्रकल्प (Pilot Project) राबवणार आहे. त्यासाठी समर्थनची मदत घेतली जाईल व तसा प्रस्ताव जिल्हा परिषद पालघरकडून मंजूर करून घेतला जाणार असल्याचे श्रीम. सिंग यांनी गसांगितले. 

‘माहेर घर योजनेची’, अंमलाबजवणी राज्यभरात चिंताजनक असून जव्हार तालुक्यातही ती प्रभावी होत नाही असे घरत यांनी म्हटले त्यांवर ती प्रभावीपणे व्हावी यासाठी श्रीम. सिंग यांनी ही योजना लवकरात लवकर कार्यान्वयीत कशी होईल यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱी (DHO) सोबत चर्चा करू असे सांगितले. 

‘बाल संजिवन छावणी’, ‘विठु माऊली चारीटेबल ट्रस्ट’,  येथे जी कुपोषित बालके उपचारासाठी येतात त्यांच्या पालकांना आपला रोजगार बुडवून यावे लागते. ही बाब छावणीच्या प्रमूख घाटाळ यांनी श्रीम. सिंग यांच्या निदर्शनास आणुन दिले. त्यांवर उपचाराच्या काळात बुडीत मजुरी मिळावी या मागणीचा प्रस्ताव श्रीम. घाटाळ यांच्याकडे तयार करून मागितला आहे; तो प्रस्ताव त्या स्वतः वरिष्ठांकडून मंजुर करून घेतील असेही सांगितले. दूर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाची गाडी देण्याचा प्रस्ताव मंजुर करून घेतला जाईल असे आश्वासन दिले. 

तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मागील तीन वर्षाची डीबीटी अंतर्गत मिळणारी मदत प्रलंबित असून ती विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळावी असे काकड यांनी सांगितले, त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून ती मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. 

यावेळी अशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे प्रश्न, आरोग्य, महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी व आश्रमशाळेत शिकणाऱ्या मूलांचे प्रश्न या सर्व विषयावर आज सविस्तर चर्चा झाली असून किमान जव्हार तालुक्यातील महिला व बालकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा, यावेळी भेट घेणाऱ्या समर्थनच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. 

From Around the web