महा मेट्रो पिंपरी-चिंचवड स्टेशन ब्रॅण्ड अम्बिसिटरपदी संगीता तरडे 

 
d

पिंपरी-चिंचवड  - महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड च्या पिंपरी-चिंचवड स्टेशन ब्रॅण्ड अम्बिसिटरपदी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांची निवड करण्यात आली असून त्यांना महा मेट्रो चे विनोद कुमार आगरवाल डायरेक्टर ऑपरेशन ऑण्ड मेंटेनन्स यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी महा मेट्रो चे डी.जी.एम मनोजकुमार डैनिल उपस्थित होते.

    संगीता तरडे ह्या मागील तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील महिलांसाठी त्यांच्या महिला फोरम च्या माध्यमातून उल्लेखनीय काम करत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची महा मेट्रो च्या पिंपरी-चिंचवड स्टेशन ब्रॅण्ड अम्बिसिटरपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती डायरेक्टर विनोद कुमार आगरवाल यांनी दिली.

d

     महा मेट्रो च्या ब्रॅण्ड अम्बिसिटर झालेल्या संगीता तरडे ह्या देशातील पहिल्या महिला असून पुणे मेट्रो चे काम सुरू झाल्या पासून पुणे मेट्रो ची ओळख आणि त्याचा प्रसार होण्यासाठी संगीता तरडे यांनी अनेक वेळा महा मेट्रो च्या अनेक उपक्रमात सहभाग घेऊन हजारो महिलांचा सहभाग नोंदविला आहे त्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

     ब्रॅड अम्बिस्टिरपदी महा मेट्रो ने माझी नियुक्ती केली त्या बद्दल मी मनापासून आभारी आहे.महा मेट्रो चा प्रवास हा सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त असल्याने निश्चितच महा मेट्रो पिंपरी-चिंचवड करांच्या पसंतीला उतरेल.पिंपरी-चिंचवड करांची इंधन बचत,वेळ बचत,प्रदूषणमुक्त आरोग्य जपण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेट्रो चा वापर व्हावा यासाठी मी प्रयत्नशील राहिल आणि  मेट्रो चा वापर करतील असा मला विश्वास आहे अशा प्रतिक्रिया संगीता तरडे यांनी व्यक्त केल्या...

From Around the web