सहायक धर्मादाय आयुक्त  राजेश परदेशी यांना पीएच. डी. 

 
s

पुणे : सहायक धर्मादाय आयुक्त (पुणे विभाग) श्री. राजेश मोहनलाल परदेशी यांनी भारती विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली आहे. "दि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट, १९५० ॲन्ड इटस् इफेक्टीव्ह इम्प्लिमेंटेशन रिलेंटिंग टू पब्लिक ट्रस्टस् रजिस्ट्रेशन ऑफीस : अ क्रिटिक" हा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. 

श्री. परदेशी यांनी हा प्रबंध न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. या प्रबंधामध्ये त्यांनी पब्लिक ट्रस्टचा ऐतिहासिक मागोवा, प्रचलित  कायद्याचे परिणाम, टीकात्मक टिपणी, इंग्लंड-अमेरिका- भारत या तीन देशातील चॅरिटी कायद्याच्या तुरतुदींचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. 

प्रबंध सादर करताना त्यांनी पुणे विभागातील विविध वर्गातील शंभर विश्वस्तांकडून खुल्या प्रश्नावलीव्दारे व पुणे, मुंबई, सोलापूर येथ विशेषतः ट्रस्ट लॉ क्षेत्रातील वकील वर्गाकडून प्रश्नावली स्वरुपात माहिती गोळा करून, त्याचे विस्तृत स्वरूपात अवलोकन करून दि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्टस् ॲक्ट १९५० या कायद्याच्या तरतुदीमधील सुधारणांबाबत उहापोह केलेला आहे.

From Around the web