महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केलेल्या शिवजयंती  तैलचित्राचे अनावरण

 
s

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशातील पहिली शिवजयंती साजरी केली या प्रसंगाच्या तहल चित्राचे अनावरण महात्मा फुले वाडा या ठिकाणी करण्यात आले.

 जेम्स डगलस या इतिहास अभ्यासकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने तो प्रभावित झाला म्हणून महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने तो भारतात आला मात्र त्याला ते समाधी स्थळ भेटले नाही म्हणून तो व्यथित झाला. 

आपल्या मायदेशी जाता जाता एका इंग्रजी वृत्तपत्रात त्याने उद्विग्न होऊन याविषयी लेख लिहिला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि तो लेख त्याकाळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाचनात आला आणि आपल्या देशातील आपल्या राज्यातील एवढ्या थोर राज्याबद्दल वृत्तपत्रात छापून आलेला लेख वाचून महात्मा फुले यांनीही खंत व्यक्त करीत आपल्या सहकाऱ्यांसमवेत थेट रायगड गाठले आणि अथांग परिश्रमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधली व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा लिहिला व 1869  रोजी, छत्रपती शिवाजी महाराज यांची देशातील पहिली जयंती साजरी केली असा इतिहास सांगितला जातो . 

मात्र या छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती साजरी होतानाचे एकही छायाचित्र किंवा फोटो उपलब्ध नव्हता त्यामुळे चित्रपट दिग्दर्शक अभिनेते देविदास धुरंगे आणि लेखक पत्रकार शिवराम कांबळे यांनी यावर अभ्यास केला व चित्रकार सोमनाथ स्वामी यांना ही संकल्पना सांगितले या संकल्पनेवरून सोमनाथ स्वामी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची देशातील जी पहिली जयंती साजरी केली त्या प्रसंगाचे तैलचित्र रेखाटले. 

x

या तैलचित्राचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले वाड्यात करण्यात आले , यावेळी आईसाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, अरुण दादा बेल्हेकर ,युवा राष्ट्र निर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेलेकर, शिवराम कांबळे ,देविदास झुरूंगे  ,अतुल रासकर, एकनाथ रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेळके तर आभार अतुल रासकर यांनी मांडले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थित आणि या चित्राचे स्वागत करून कौतुक केले.

From Around the web