२०२१ : भारत व जगासाठी कसे असेल येणारे वर्ष ?

 
२०२१ : भारत व जगासाठी कसे असेल येणारे वर्ष ?

एक प्रचंड आव्हानात्मक वर्ष सरत आहे, त्यानिमित्ताने यातील चढ-उतार, सुधारणा आणि २०२१ मधील संभाव्य संधींचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. कोव्हिड-१९ साथीमुळे औद्योगिक उत्पादन, आयात, इंधनवापर आणि यामुळे अनेक गोष्टींमध्ये घट झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर अचानकपणे व प्रचंड प्रभाव पडला. त्यामुळे २०२० वर्षातील पहिल्या तिमाहीत शेअर बाजारही कोसळला. त्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे लॉकडाऊनची मालिका सुरु झाली अन् लाखो लोकांचे रोजगार, बचत, अगदी दैनंदिन आयुष्यही संकटात आले.

अर्थात, मे महिन्यापासून अर्थव्यवस्थेत सकारात्मक सुधारणेचे संकेत दिसून येत आहेत. टप्प्या-टप्प्याने अनलॉक करत भारत पूर्णपणे लॉक़ाऊनमधून बाहेर पडला. मार्च महिन्यापासून अर्थव्यवस्थेला झालेले अनिश्चित नुकसान भरून काढणे गरजेचे होते. त्यामुळे सरकारने संबंधित आर्थिक व सामाजिक सुधारणांचे कार्यक्रम हाती घेतले. दरम्यान येणारे वर्ष भारत व जगासाठी कसे असेल याचा अंदाज घेतला आहे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय यांनी.

आर्थिक घसरणीनंतर केलेल्या उपाययोजना: कोणत्याही संकटात कमीत कमी अडथळ्यांसह सर्वकाही पूर्वपदावर आणण्याकरिता विशेष आर्थिक उपाय योग्य ठरतात. बाजारपेठेतील उत्पादकता पूर्वस्थितीत आणण्याकरिता जगभरातील सरकारांनी वित्तीय प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले. उदा. अमेरिकी सरकारने मार्च महिन्यात २.७ ट्रिलियन डॉलरची मदत केली. तसेच अमेरिकी फेडरल रिझर्व्हने त्यानंतर ४ ट्रिलियन डॉलर्सची मदत दिली. यामुळे बाजाराच्या भावनांना उभारी मिळाली, तसेच सर्वच क्षेत्रातील विस्कटलेली घडी सावरण्यास मदत झाली.

याचप्रमाणे, भारत सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ मोहीम सुरु केली. याअंतर्गत अर्थमंत्र्यांनी अनुदान, थेट लाभ हस्तांतरण आणि आर्थिक प्रोत्साहन यासह काही चलनिषयक योजनाही जाहीर केल्या. भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे रुग्णांची संख्याही लाखोंच्या घरात नोंदवली गेली. सुदैवाने आता रुग्णसंख्येत घट होत आहे. रुग्णसंख्या जास्त असूनही उपचार प्रभावी ठरले. त्यामुळे संमिश्र पीएमआय (परचेस मॅनेजर्स इंडेक्स) मिळाला. ऑक्टोबरच्या ५४.६ च्या तुलनेत तो या महिन्यात ५८.९ एवढा नोंदला गेला.

आत्मनिर्भर भारत मोहीमेच्या दोन टप्प्याद्वारे, सरकारने विविध योजनांसाठी १४.४९ कोटी रुपयांची मदत केली. अतिरिक्त २.६५ लाख कोटी रुपयांच्या तिस-या टप्प्याद्वारे नुकतीच आर्थिक कामकाजाला गती देण्यात आली. यासोबतच, आरबीआयने ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत १२.७१ लाख कोटी रुपयांच्या स्वतंत्र उपाययोजना जाहीर केल्या. २०२० च्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था सुमारे -२३% पर्यंत संकुचित झाली असली तरी सध्या ती ७.५ % या अपेक्षित अंदाजापेक्षा उत्तम कामगिरी करत आहे. वित्तवर्ष २०२१ च्या अखेरीस ५% च्या आसपास सकारात्मक वृद्धी दर नोंदवला जाण्याचा अंदाज आहे.

अलीकडील ट्रेंड, बाजाराचे अंदाज आणि पुढे जाण्याचा मार्ग: विषाणूविरोधातील लढ्याबाबत सकारात्मक बातमी म्हणजे मॉडर्ना आणि फायजरप्रमाणेच बायोटेक या फार्मा संस्थांच्या कामगिरीने बाजाराच्या भावना उंचावल्या. प्रत्येकासाठीच हा उत्सवाचा क्षण असल्याचे सिद्ध झाले. लसीच्या यशस्वी चाचण्या, असंख्य संशोधनांतर ९० टक्के परिणाम चांगले आले. आता या कंपन्या संबंधित ड्रग एजन्सीच्या मंजुरीच्या टप्प्यात आहेत. अधिका-यांच्या मते, मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन जानेवारी अखेरपर्यंत लसीकरणाची मोहीम सुरू होईल. तसेच या वित्तीय वर्षाच्या अखेरीस याची अंमलबजावणी व्यापक होईल.

लसीच्या चाचण्यांसंबंधी बातमी, प्रोत्साहनपर पॅकेज आणि वाढीव औद्योगिक कामकाज यामुळे मध्यम व दीर्घ झेप घेण्यासाठी बाजाराला हवे असलेले प्रोत्साहन मिळेल. बाजारातील सध्याच्या सुधारणांनुसार गुंतवणुकदारांचा दृष्टीकोन सावध असू शकतो, मात्र २०२२ आणि २०२३ या वित्तवर्षात जाताना एकूण अंदाज सकारात्मक असेल.

सर्वात चांगली कामगिरी करणा-या क्षेत्रांचा विचार करता, आयटी आणि फार्मा कंपन्यांनी यात पुढाकार घेतला. त्यांनी मजबूत महसूल कमावला. यासह, ऑटोमोबाइल, सिमेंट आणि कंझ्युमर ड्युरेबल सेक्टर्सदेखील अर्थव्यवस्थेतील प्रगतीप्रमाणे चांगली सुधारणा करतील. कोव्हिड-१९ अस्तित्वात आल्यापासून बीएफएसआय क्षेत्रात, फिनटेक्स, एनबीएफसी, ब्रोकरेज फर्म्स यासारख्या बीएफएसआय क्षेत्रात आशादायी गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्या आहे.

तसे, अमेरिकी निकाल आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत जो बिडेन यांचा विजय यामुळे गुंतवणूकदार व व्यवसायांमध्ये आणखी नव्या आशा पल्लवित झाल्याव अखंडपणे आर्थिक सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली. अर्थात, अमेरिकी प्रशासनाने कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या पॅकेजच्या आशेमुळेही बाजारात सकारात्मक भावनांचा ट्रेंड दिसून आला. अमेरिकी सिनेट आणि फेडरल रिझर्व्हने नुकतेच ९०८ अब्ज डॉलरच्या मदतीचा प्रस्ताव दिला.

भारताबाबत विचार केल्यास, मे महिन्यापासून भारतातील एफआयआयच्या प्रवाहात अखंड वृद्धी दिसून आली. उदा. ऑगस्ट महिन्यातील दरमहा एफपीआय गुंतवणूक ४७,०८० होती. ती नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ६०,३५८ कोटी रुपयांवर गेली.

डिसेंबर महिन्यातील दुस-या आठवड्यात एफपीआय गुंतवणुकीचा आकडा २६,२०० कोटी रुपयांपुढे होता. इक्विटी बाजारात २०२१ च्या अखेरीस उच्च परताव्यांची शक्यता आहे. बाजारपेठेने आर्थिक सुधारणानंतर १०-१२ टक्के रिटर्न्स देण्यास सुरूवात केली आहे.

एकूणच, २०२१ या वर्षात सुरुवातीला अंदाज केल्यापेक्षाही आशियाई अर्थव्यवस्थेत कित्येक पटींनी जास्त सुधारणा दिसून येणार असल्याने पुढील वर्षाचे चित्र नक्कीच उजळ असेल.

From Around the web