झिंक धातूच्या स्थितीत सुधारणा

ऑक्टोबर २०२० पासून झिंकचे दर एलएमईवर २० टक्क्यांनी वाढले तर एमसीएख्सवर १७ टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. खाणकामातील अडथळे आणि मागणीतील दमदार वृद्धी यामुळे झिंकच्या दरांत वाढ झाली. परिणामी जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असतानाही धातूला योग्य मार्ग काढण्यास मदत झाली. भारतात झिंकच्या मागणीतही निरंतर वृद्धी दिसून आली. यापैकी बहुतांश मागणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टील उत्पादक कंपन्यांकडून निर्माण झाली.
बेस मेटलच्या क्षेत्रातील नुकतीच झालेली वाढ ही अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन यांच्या विजयानंतरच्या सकारात्मकतेमुळे दिसली. तसेच कोव्हिड-१९ विषाणूविरोधी संभाव्य लसीच्या आशेमुळेही हे परिणाम दिसले. फायझर इंक नंतर मॉडर्ना आणि अॅस्ट्राझेनेका कंपन्यांनीही त्यांच्या लसीत प्रगती असल्याचा दावा केला. त्यामुळे जागतिक आर्थिक स्थितीत चांगली सुधारणेच्या आशा वाढल्या व औद्योगिक धातूच्या अर्थकारणाला गती मिळाली. झिंकच्या दरात आलेल्या लक्षणीय वृद्धीच्या कारणांबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे रिसर्च असोसिएट श्री. यश सावंत.
खाणकामातील अडथळे: खाणीतील घसरते उत्पादन, विशेषत: दक्षिण अमेरिकेतील उत्पादनाच्या घसरणीमुळे, झिंकच्या दरात ही लक्षणीय वृद्धी दिसून आली. इंटरनॅशनल लीड अँड झिंक स्टोरी ग्रुप (ILZSG) नुसार, २०२० मध्ये जागतिक झिंक खाण उत्पादन ४.४ टक्क्यांनी घसरण्याची अपेक्षा आहे. कारण पेरू, बोलिव्हिया आणि मेक्सिको यासारख्या प्रमुख उत्पादक देशांमधील खाणकाम पूर्णपणे ठप्प होते. भू-तांत्रिक बिघाडामुळे गॅम्सबर्ग खाणीत काही कर्मचारी अडकल्याने ही खाण (वार्षिक २५०,००० टनांची क्षमता) तात्पुरती बंद पडली. त्यामुळेही खाणीतून येणा-या पुरवठ्यात घसरण दिसून आली.
चीनमधील झिंक कॉन्सन्ट्रेशन प्रक्रियेसाठीचे शुल्कही १०० डॉलर प्रति टनांपेक्षा खाली घसरले. हे प्रमाण ऑगस्ट २०२० च्या अखेरीस दर्शवलेल्या श्रेणीपेक्षा ४० टक्के खाली दर्शवले. साथीमुळे घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे कच्च्या धातूची उपलब्धता कमी झाली. तसेच जागतिक स्मेल्टर्सकडून वाढत्या मागणीमुळे ऑपरेटर्सना शुल्क कमी करण्यास भाग पाडले.
पुरवठ्यात लक्षणीय घट दिसून आल्यानंतरही, ILZSG कडून मिळालेल्या अहवालात असे दिसून आले की, जागतिक झिंक मार्केटमध्ये २०२० मध्ये ६२०,००० टन सरप्लस होण्याचा अंदाज आहे. त्यातच, चीनकडून भरपूर खरेदीचे संकेत दिसून आले नाहीत (तांबे व अॅल्युमिनिअमच्या उलट). परिणामी झिंकची छुपी साठेबाजी होण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
दुसरी लाट: चीनच्या लक्षणीय वृद्धीमुळे बाजाराला प्रोत्साहन मिळाले असताना, उपरोक्त कालावधीत अतिरिक्त प्रोत्साहनावरील बेट्स वाढत आहेत. त्यातच जागतिक आर्थिक चिंता आणखी वाढल्या आहेत. नव्या कोरोना रुग्णांच्या विक्रमी वाढीमुळे अनेक देशांमध्ये पुन्हा कठोर निर्बंध लादण्यात आल्याने बाजारपेठही सावध झाली. जागतिक रुग्णांच्या संख्येने ७१.७ दशलक्षांचा आकडा पार केला असून मृत्यूची संख्याही १.५९ दशलक्षांपेक्षा पुढे पोहोचली.
याआधी मार्च २०२० मध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते, त्यामुळे जागतिक ऑटोमोबाइल व बांधकाम उद्योगातील कामकाज जवळपास ठप्प झाले होते. औद्योगिक धातूंचे हे मोठे ग्राहक आहेत. विषाणूची नव्याने आलेली लाट आणि विविध देशांमध्ये नव्याने झालेल्या निर्बंधांमुळे जागतिक आर्थिक स्थिती पुन्हा ढासळू शकते.
विषाणूच्या चिंतेमुळे एलएमई वेअरहाऊसमध्ये साठ्यातील पातळीतही वाढ होऊ शकते. फेब्रुवारी २०२० मध्ये अनेक वर्षांमधील निचांक (४९,६२५ टन) गाठल्यानंतर, झिंक साठ्यांनी नऊ महिन्याच्या कालावधीत ३५० टक्क्यांची वृद्धी अनुभवली. (झिंक एलएमई साठे १२ डिसेंबर २०२० पर्यंत २,१४,८७५ टनांपर्यंत पोहोचले.)
आउटलुक: जगभरात कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये धोकादायक वाढ होत असल्याने झिंक व इतर औद्योगिक धातूंची स्थिती प्रतिकूल असल्याचे दिसते. येत्या काही महिन्यात चीनकडून स्टीलची मागणीही थांबेल, असा अंदाज आहे. हिवाळ्यात डाऊनस्ट्रीम क्षेत्रातील कामकाज मर्यादित असते, त्यामुळे झिंकवर दबाव येऊ शकतो.
तथापि, साथीचा व्यापक परिणाम लक्षात घेता, जागतिक मध्यवर्ती बँक सक्रिय झाल्या आहेत. अतिरिक्त प्रोत्साहन पॅकेज आणि वर्षभराच्या संघर्षानंतर लसीचा किरण दिसल्याने औद्योगिक धातूची प्रगती होऊ शकते. सरप्लसच्या चिंतेमुळे तसेच विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे, झिंकचे दर २०० रुपये प्रति किलो (सीएमपी: रु. २१६.४) पर्यंत घसरतील, असा अंदाज आहे.