ही आहे श्रमजीवी संघटनेची कॉम्रेडशीप ... 

 
ही आहे श्रमजीवी संघटनेची कॉम्रेडशीप ...

कोरोनाची पहीली लाट आली तेव्हा लोकांची उपासमार होऊ नये म्हणून संघटनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सक्रिय सभासद यांनी गावागावांत जाऊन धान्य पोहचवले. सरकारनेही मदतीचा हात द्यावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. विवेक भाऊ, विद्युल्लता ताईंसह उपोषणाला बसले. पुढेही लढा सुरूच ठेवला. अन सरकारला खावटी योजनेची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. 

या पहिल्या लाटेत ग्रामीण भागात जीवीत हानी कमी झाली. मात्र दुसर्या लाटेचा फटका तिथेही जाणवतो आहे. रोज नवे रूग्ण सापडत आहेत. संकट काळात लोकांच्या मदतीला धावून जाणं हा संघटनेचा स्वभावधर्म. तो ती आताही जपते आहे. "श्रमजीवी कोविड-केअर सेंटर" उभारून सरकारच्या खांद्याला खांदा लावत एक पाऊल पुढे टाकत आहे. ते उभारण्यासाठी संघटनेचे "कोरोना योद्धे" यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. 

यात सभासदांपासून ते शिखर पातळीवरील सर्वच नेते, पदाधिकारी एकजूटीने कामाला जुटले आहेत. परिस्थिती लक्षात घेता "कोविड-केअर सेंटर" उभारण्याचा जेव्हा एकमताने निर्णय घेतला गेला. तेव्हा सगळेचजण कामाला लागले. विवेक भाऊंसह संघटनेचे शिखर पदाधिकारी त्यात संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्षा स्नेहा दुबे-पंडित, सरचिटणीस विजय जाधव, बाळाराम भोईर, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार, इ. व निलेश वाघ यांच्यासोबत श्रमजीवी सेवादलाचे तरूण कार्यकर्ते विविध काम करतांना दिसत आहेत. 

जवळच्या सभासदांना संपर्क केल्यावर तात्काळ त्यांनी पुढाकार घेऊन जागेची स्वच्छता केली. तर सर्व पदाधिकारी आपआपला संपर्क वापरून बाकीची व्यवस्था करत आहेत. त्यात जागेची व्यवस्था, लागणार्या साहीत्याची व्यवस्था( बेड, बेडशीट, उशी व इतर सर्व साहीत्य), स्टाफची व्यवस्था, अधिकार्यांशी संपर्क, परिसर व्यवस्था, रुग्णांना प्रवेशासाठी रस्ता बनविणे, गेट तयार करणे,  कार्यकर्त्यांना देण्यासाठी  औषधांचे पॅकिंग करणे ही सर्व कामे सभासद,कार्यकर्त्यांच्या बरोबरीने स्वत: पदाधिकारी करत आहेत. त्याच वेळेला एकीकडे गावागावात श्रमजीवी संघटनेचे कोरोना जनजागृतीसाठी "जगा आणि जगवा अभियान सूरू आहे. ही आहे श्रमजीवी संघटनेची कॉम्रेडशीप !!

ममता परेड

From Around the web