ट्विटरवरून ट्रम्प यांनी बदलले परराष्ट्रमंत्री
Mar 14, 2018, 17:50 IST

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ‘सीआयए’च्या संचालक पदी माइक पोम्पेओ यांची नियुक्ती करत परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांना पदच्युत केले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी ट्विटरवरून टिलरसन आफ्रिका दौऱ्यावर असतानाच ही घोषणा केली.
ट्रम्प यांचे टिलरसन यांच्याशी अनेक दिवसांपासून मतभेद होते. त्यांना या पार्श्वभूमीवरमंत्रिमंडळातून काढण्यात आले. ट्विट करताना ट्रम्प यांनी ‘सीआयएचे संचालक माइक पोम्पेओ नवे परराष्ट्रमंत्री असतील. अतिशय चांगल्या पद्धतीने ते ही जबाबदारी पार पाडतील, असे म्हटले आहे. पण पोम्पेओ यांच्या नियुक्ती बाबत ट्रम्प यांना सिनेटकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे.
व्हाइट हाउसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी सध्याच्या नाजूक परिस्थितीमध्ये पोम्पेओ हे परराष्ट्र मंत्रिपदासाठी अतिशय योग्य व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. तसेच पोम्पेओ अमेरिकेचे जगातील प्रतिष्ठेचे स्थान पुनर्स्थापित करणे, मित्रदेशांची आघाडी आणखी मजबूत करणे, शत्रू देशांविरोधातील कारवाईला बळ देणे, कोरियाचा द्विपकल्प अण्वस्त्रांपासून मुक्त करणे यामध्ये महत्त्वाचे योगदान देतील. त्यांच्या लष्कर, सीआयएचे प्रमुख आणि काँग्रेसमधील अनुभवाचा परराष्ट्रमंत्री म्हणून फायदाच होणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.