आरोग्य विभाग पदभरती परिक्षेबाबत  व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत आरोग्य विभागाचा खुलासा 

पेपर फुटीचा प्रकार नव्हे ; उमेदवारांचा संभ्रम दूर 
 
s

पुणे - आरोग्य विभागाच्या गट "ड' साठी पदभरती परीक्षा उद्या (दि.31) होत आहे. मात्र त्यापूर्वीच आज सकाळपासून एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यावरून आरोग्य विभागाचा पेपर फुटीचा प्रकार असल्याची चर्चा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाच्या संचालिक अर्चना पाटील यांनी स्पष्टीकरण देत हा पेपर फुटीचा प्रकार नसल्याचे सांगितले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत केवळ उमेदवारांचे हजेरीपत्रक असून, ते गोपनीय नसते. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्‍वास न ठेवता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

आरोग्य विभागाच्या प्रत्येक पदभरती परीक्षेत काही संघटनेकडून आरोग्य विभाग व यंत्रणेस बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा थेट परिणाम परीक्षार्थी तरुणांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे या व्हिडीओ बाबत तातडीने खुलासा करून उचित कारवाई करण्याची मागणी युवसेनेच्या कल्पेश यादव यांनी आरोग्य विभागाच्या संचालक अर्चना पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच संबंधितावर कारवाई करण्याची मागणी यादव यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अन्य संघटनांकडून या प्रकरणाची चौकशीची मागणी होत आहे. 

यासंदर्भात आरोग्य विभागाच्या संचालक अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधले त्या म्हणाल्या, सध्या सोशल माध्यमातून परीक्षेसंदर्भात व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याची प्राथमिक सत्यता पाहिली असता ते उमेदवारांचे हजेरी पत्रक आहे. ते गोपनीय नसते. त्यावरून आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचा समज निर्माण होत आहे. कोणताही पेपर फुटलेला नाही. या व्हिडिओबाबत चौकशी सुरू असून, परीक्षार्थ्यांनी परीक्षेला तणावमुक्‍त वातावरणात सामोरे जावे, असेही त्या म्हणाल्या.

From Around the web