युनियन बँक ऑफ इंडिया च्या ई-लीलावास उत्तम प्रतिसाद

 
 युनियन बँक ऑफ इंडिया च्या ई-लीलावास उत्तम प्रतिसाद


मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाने एकत्रीकरणानंतर बँकिंग क्षेत्रात सकारात्मक पावले उचलली आहेत. पहिल्या तिमाहीत ३३३ कोटी रु. चा नफा नोंदवून या बँकेने आता NPA व्यवस्थापनासाठी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत.

लॉकडाउन असूनही नॉन-परफॉर्मिंग झालेल्या खात्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या लिलावाचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे.

दिनांक ०१. ०४. २०२० रोजी एकत्रीकरण झाल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचा आकार आता वाढला आहे. या बँकेने तटस्थ आणि पारदर्शक पद्धतीने जाहीर ई-लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून स्पर्धात्मक दारांनी वाणिज्यिक जागा, फ्लॅट, स्वतंत्र घरे, रिकामे प्लॉट, औद्योगिक युनिट्स यांसारख्या स्थावर मालमत्तेचा मासिक मेगा ई-लिलाव योजण्यात यश मिळवले आहे.

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात बँकेने त्यांच्याकडे असलेल्या सिक्योर्ड मालमत्तेच्या, विशेषतः स्थावर मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया जुलै २०२० पासून वित्तीय मालमत्तांचे सिक्युरिटीकरण आणि पुनर्निर्माण आणि सुरक्षा व्याज अंमलबजावणी कायदा २००२ अंतर्गत यशस्वीरित्या सुरू केली आहे आणि दर महिन्याला मेगा ई-लिलाव करण्याची प्रथा चालू ठेवली आहे. बँकेने या आर्थिक वर्षात चार मेगा ई-लिलाव योजले आहेत आणि प्रत्येक लिलावात यशस्वी बीडर्सना अनेक मालमत्ता विकल्या आहेत. लिलावातील संतुष्ट खरेदीदारांची संख्या ३०५ वर पोहोचली आहे.

दर महिन्याला अधिक व्यवस्थित पद्धतीने आणि सुनियोजित स्वरुपात मेगा ई-लिलाव करण्याचा आणि ऑनलाइन ई-लिलाव योजण्याचा युनियन बँकेचा मानस आहे, जेणे करून संभावित खरेदीदारांना मेगा ई-लिलावाच्या माध्यमातून मालमत्तांचा अधिक चांगला सौदा करता येऊ शकेल. ऑनलाइन ई-लिलाव मंच बीडर्सना घर / इतर मालमत्तेचा शोध घेताना सर्व लाभ, सोय-सुविधा आणि बिडिंग प्रक्रियेत सहभागी होण्याची सुकरता प्रदान करतो, त्यांचा वेळ वाचवतो आणि बिडिंग प्रक्रिया पारदर्शक असल्याची खातरजमा करतो.

From Around the web