Pune Crime: RTI ची भीती दाखवून बांधकाम व्यावसायिकांना खंडणी मागणारा राजेश बजाज अटक

पुणे - पुणे शहरातील बांधकाम व्यवसायिकांना माहीती अधिकार कायद्याची भिती दाखवुन खंडणीची मागणी करणारा सराईत गुन्हेगार राजेश बजाज व त्याचे साथीदारास अटक करण्यात आली. ही कारवाई खंडणी विरोधी पथक दोनने केली आहे
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक व इतर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी राजेश उर्फ बॉबी खैरातीलाल बजाज उर्फ सचदेव व त्याचा साथीदार बापु गोरख शिंदे हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होते. आरोपी राजेश बजाज हा त्याचे साथीदारांचे मदतीने पुणेशहरातील बांधकाम व्यवसायिकांना माहीती अधिकार कायद्याची भिती दाखवुन तसेच सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची भिती घालुन खंडणीची मागणी करत होता. यापुर्वी त्याचेवर , डेक्कन ,कोरेगाव पार्क ,शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
फरारी आरोपींचा पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व त्यांचे पथक घेत होते. दरम्यान तो लष्कर न्यायालयाजवळ येणार असल्याची खबळ मिळाली . त्यानूसार सापळा रचुन राजेश उर्फ बॉबी खैरातीलाल बजाज यास ताब्यात घेतले. तर नऱ्हे येथून बापू गोरख शिंदे यास ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुके, प्रविण पडवळ, संग्राम शिनगारे, विजय गुरव, संपत औचरे, अमोल पिलाने, सैदोबा भोजराव, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले, महीला पोलीस आशा कोळेकर, रुपाली कर्णवर, यांनी केलेली आहे.