पुणे वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी

 
sd

पुणे  - हेल्मेट नाही घातले म्हणून एका वकिलाची गाडी जप्त केल्याच्या प्रकरणात कोर्टाने वाहतूक पोलिसांची कानउघाडणी केली आहे. चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्यासाठी जबरदस्ती करू नये, तसे पोलिसांना करता येणार नाही. एखाद्याला चलनाची तडजोड रक्कम तत्काळ भरायची नसल्यास अथवा सदरचे प्रकरण कोर्टात चालवायची तयारी दर्शविली, तर कारवाई करत असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी संबंधित केस योग्य त्या कोर्टात तत्काळ पाठवावी. तसेच पोलिसांना सदरच्या चलनाच्या रक्कमेच्या वसुलीसाठी मोटार वाहन कायदा, कलम २०७ प्रमाणे वाहन अडकवून ठेवण्याचे अथवा जप्त करण्याचे अधिकार नाहीत, असे या निकालात नमूद करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.  

  २६ मार्च २०१९ रोजी हा प्रकार घडला. स्वारगेट वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचारी वैशाली कोळी यांनी अॅड. करण झाड यांची स्वारगेट येथे हेल्मेट नाही म्हणून गाडी पकडली होती. त्या वेळी त्यांनी 'ऑनलाइन चलन टाका. माझ्याकडे आता पैसे नाहीत किंवा त्याचा खटला दाखल करा. मी तो कोर्टात चालवीन', असे सांगितले. त्यांना हेल्मेट नाही म्हणून जागेवर दंड भरण्यास सांगण्यात आले. तसेच वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तांचा आदेश असल्याचे सांगितले. अॅड. झाड यांनी उपायुक्तांच्या संबंधित आदेशाची प्रत मागितली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच आदेशही दाखविण्यात नाही. उलट जर दंड जागीच भरला नाही तर तुमची गाडी अथवा वाहन चालविणेचा परवाना जप्त करू, अशी धमकी देण्यात आली. 


पोलिस कर्मचारी वैशाली कोळी यांनी अॅड. झाड यांची गाडी जप्त केली. त्यानंतर अॅड. झाड यांनी अॅड. चेतन भुतडा यांच्यामार्फत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मोटार वाहन न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. कोर्टाने पोलिस कर्मचारी यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली. हेल्मेट दंडाची रक्कम अथवा चलन जागीच भरले नाही, तर पोलिसांनी संबंधित केस मोटर वाहन न्यायालयाकडे पाठवली पाहिजे. "तसेच चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये," तसे पोलिसांना करता येणार नाही. जर एखाद्याला चलनाची तडजोड रक्कम तत्काळ भरायची नसल्यास अथवा सदरचे प्रकरण कोर्टात चालवायची तयारी दर्शविली, तर कारवाई करत असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी संबंधित केस योग्य त्या कोर्टात तत्काळ पाठवावी. तसेच पोलिसांना सदरच्या चलनाच्या रक्कमेच्या वसुलीसाठी "मोटार वाहन कायदा, कलम २०७ प्रमाणे वाहन अडकवून ठेवण्याचे अथवा जप्त करण्याचे अधिकार पोलीसांना नाहीत." असे निकालात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती अॅड. चेतन भुतडा यांनी दिली.  

 वाहतूक कर्मचारी यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून गाडी जप्त केलेली आहे. "मोटर वाहन कायद्या नुसार कोणत्याही वाहतूक कर्मचाऱ्यांना हेल्मेट घातले नाही म्हणून गाडी अथवा वाहन परवाना जप्त करण्याचा अधिकार नाही.

From Around the web