पुण्यातील कुंभारवाड्यात दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

घरात केमिकल रिऍक्‍शन झाल्याचा संशय
 
as

केशवनगर -  पुण्यातील केशवनगर - मुंढवा भागातील   कुंभारवाडा  कॉलनीतील  एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार  उघडकीस आल्यानंतर  मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी  धाव घेतली आहे.

शरद भुजबळ (47, रा. कुंभारवाडा, केशवनगर, मुंढवा, पुणे) आणि हेमा (43 – ही नेपाळी महिला आहे) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. शरद भुजबळ हा एनआयबीएम रोडवरील एका ट्रव्हल्समध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होता. शरद याच्याशी संपर्क होत नसल्याने त्याचा मित्र परवेज आलमने त्याचे घर गाठले. परवेज शरदच्या घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. 

दरम्यान, घरातील गॅस चालू होता पण सिलेंडर संपलेले होते. घराच्या शेजारी केमिकलचे कॅन्ड आढळून आले आहेत. शरद आणि हेमा यांच्या नाकातून रक्त येत असल्याचं देखील  दिसलं आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात  पाठविण्यात आले आहे.शरद आणि हेमा यांचा मृत्यू नेमका कशामुळं झालाय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना म्हणजे अपघात की घातपात याचा पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, शरद आणि हेमा यांनी आत्महत्या  केली असे देखील सद्यपरिस्थिती पाहून म्हणता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, मुंढवा पोलिसांनी घटनेची नोंद करून  तपासास सुरूवात केली आहे.

From Around the web