इंजिनिअर तरूणीने आरडाओरड केल्यामुळे मोबाईल चोर सापडला 

 
इंजिनिअर तरूणीने आरडाओरड केल्यामुळे मोबाईल चोर सापडला

पुणे - इंजिनिअर तरूणीच्या हातातील मोबाईल हिसकाविणा-या एका भामट्या चोरट्याला  स्थानिक नागरिकांनी पकडून येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी २० वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. राम आहुजी केदार (वय २३, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.


फिर्यादी तरूणी आयबीएम कंपनीत कामाला आहे. काल मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास काम संपवून तरूणी कॅबची वाट पाहत कंपनीच्या गेटजवळ उभी होती. त्यावेळी रस्त्याने पायी चालत आलेल्या या भुरट्या चोराने तरूणीच्या हातावर फटका मारून मोबाईल घेतला आणि तो पळून जात होता. यावेळी तरूणीने आरडा-ओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी  त्याच्यामागे धावत जाऊन त्यास  पकडले आणि येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.  याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले तपास करीत आहेत.

From Around the web