शेअर बाजारातील मंदीत निधी व्यवस्थापनाचे ५ मार्ग

 
शेअर बाजारातील मंदीत निधी व्यवस्थापनाचे ५ मार्ग

गुंतवणूक करताना भावनांना थोडासा आवर घातला पाहिजे, हे शेअर बाजाराने वेळोवेळी सिद्ध केले आहे. २०२० मध्येही शेअर बाजाराने हे सहजपणे अधोरेखित केले. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत बेंचमार्क निर्देशांकात ४०% सुधारणा झाली. अनेक गुंतवणूकदार व व्यापा-यांनी घाबरून त्यांची गुंतवणूक काढून घेतली. काहींनी लोभीपणा दर्शवून अस्थिर बाजारात खूप व्यापार केला. पण ज्यांनी गुंतवणूक चालूच ठेवली व भावनेच्या आधारावर कोणताही निर्णय घेतला नाही, त्यांना चांगला नफा कमावता आला.

आज, संबंधित निर्देशांक सर्वोच्च पातळीवर व्यापार करत आहेत. किंवा बाजार कोसळण्यापूर्वी व त्याआधीपासूनच्या पातळीपेक्षा ते १०% नी उच्चांकी स्थितीत आहेत. बाजाराचे हेच सौंदर्य आहे. सर्व शेअर बाजाराच्या इतिहासातही हेच घडले आहे. जेव्हा जेव्हा प्रतिकुल स्थिती येते, त्यानंतर बाजार अतिशय शक्तीशाली स्वरुपात पुनरागमन करतो. त्यामुळे शेअर बाजारातील मंदीत निधी व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टी नेहमीच विचारात घेतल्या पाहिजेत याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे एव्हीपी मिडकॅप्स, श्री. अमरजीत मौर्य.

1. एकरकमी गुंतवणूक करू नका: बाजारात कधीही एकरकमी गुंतवणूक करू नये. त्याऐवजी तुमची गुंतवणूक एसआयपी स्वरुपात असावी. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, बाजार घसरणीवर असतानाही तुमच्या खरेदीची सरासरी वाढत राहते. त्यानंतर बाजार प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहतो, तेव्हा तुम्हाला चांगले परतावे मिळत राहतात. उदा. १ जानेवारी २०२० रोजी, सर्व निफ्टी ५० स्टॉक्समधील १२ युनिटच्या गुंतवणुकीतून तुम्हाला १७,००० रुपयांचा फायदा झाला. तर दुसरीकडे, दर महिन्यात तुम्ही एक स्टॉक खरेदी केला तर, तुमचा नफा ३५,००० पेक्षा जास्त होईल. तुमच्या गुंतवणुकीत अंतर ठेवण्याचा हा फायदा आहे.

2.दीर्घकालीन गुंतवणूक: दीर्घकालीन गुंतवणूक हा बाजारातील उदासीनता दूर करण्याचा चांगला मार्ग आहे. मंदीच्या काळात, बाजारपेठ खूप अस्थिर अवस्थेत आहे. काही गुंतवणुकदारांच्या मते, बाजाराने तळ गाठल्यानंतर आता तेजीचे स्वरुप धारण केले आहे. तर इतरांच्या मते, बाजार आणखी खाली जाईल आणि मंदीचे स्वरुप येईल. दोन विरोधी शक्ती परस्परांशी कसा संवाद साधतात, त्याचे प्रतिबिंब म्हणजे किंमती असतात. बाजार हा बहुतांश वेळा अंदाजांवर अवलंबून असतो, त्यामुळे जमीन स्तरावरील वास्तविकतेशी त्याचा फार ताळमेळ नसतो. त्यामुळे दृष्टीकोनातील सर्व अंदाज आधी दूर करावेत. शॉर्ट-टर्म इंडिकेटरनुसार वागणे टाळावे व दीर्घकालीन परताव्यांवर लक्ष केंद्रीत करावे.

3. विविधता आवश्यक: कधीकधी एखादे क्षेत्र किंवा स्टॉकचा समूह चांगली कामिगरी करतो. पण त्यातील एखादा स्टॉक चांगली स्थिती दर्शवत नाही. एक गुंतवणूकदार म्हणून, मंदी असो वा नसो, आपल्या पोर्टफोलिओत विविधता असलीच पाहिजे. तसेच, लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्सला आपल्या जोखिमीच्या भुकेनुसार पुरेसे वजन दिले पाहिजे. उदा. तुम्हाला उच्च परतावे हवे असल्यास ६०% गुंतवणूक स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये करावी तर उर्वरीत रक्कम त्यांच्या मोठ्या स्पर्धकांमध्ये करावी. तुम्हाला जोखीम नको असेल तर लार्ज कॅप स्टॉकमध्ये ७० टक्के व स्मॉल व मिड कॅपमध्ये ३० टक्के गुंतवणूक करावी.

4. दर्जेदार स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा: बाजारात उत्तम ट्रॅक रेकॉर्ड कमावलेले स्टॉक ओळखा आणि त्यातच गुंतवणूक करा. बाजार अस्थिर असताना ते बहुतांश वेळा स्थिर राहतात. आरआयएल, मॅरिको, टायटन, केईआय इंडस्ट्री आणि रेडिको खेतान यासारख्या दर्जेदार स्टॉकमधून भरपूर महसूल प्रवाह आहे. चांगल्या प्रमोटर्सचा त्यांना पाठिंबा आहे.

5. मूल्यांकनावर नजर ठेवा: वास्तविक उद्योगाच्या मेट्रिक्ससह त्यांचा परस्पर संबंध असतो. तसेच हा व्यवसाय कसा चालतो, याची एक स्पष्ट कल्पना येते. सुरक्षिततेची मार्जिन न देणा-या अति मूल्यांकन असलेल्या स्टॉक्सला टाळा. वाजवी मूल्यांकन व वाढीचा आलेख असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा. सध्या तरी नजीकच्या काळात मंदीची अपेक्षा नसली तरी हा बाजाराच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळेच, तुमचे गुंतवणूक धोरण आखताना, वरील गोष्टी लक्षा ठेवा. विशेषत: अनिश्चिततेच्या काळात व्यापारात त्यांचे पालन अवश्य करा.

From Around the web