कोरोनाच्या आणखी एका औषधाला देशात मंजुरी

स्विस कंपनीच्या अँटीबॉडी कॉकटेलला आपातकालीन वापरासाठी मंजुरी :  मार्केटिंगचे अधिकार सिप्लाकडे
 
s

नवी दिल्ली - देशात कोरोनाने हाहाकार माजवला असताना, आणखी एक चांगली बातमी हाती आली आहे. स्वित्झर्लंडमधील फार्मा कंपनी रोशेच्या कोरोना उपचारातात वापरली जाणाऱ्या 'अँटीबॉडी कॉकटेल'ला भारतात आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.मार्केटिंगचे अधिकार सिप्लाकडे राहणार आहेत. 

 कंपनीने सांगितले की, त्यांच्या अँटीबॉडी कॉकटेलला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गेनायजेशन (CDSCO) कडून अप्रूव्हल मिळाले आहे. हे अप्रूव्हल अमेरिका आणि यूरोपियन यूनियनमध्ये आपातकालीन वापरासाठी दिलेल्या डेटाच्या आधारावर मिळाले आहे.


अँटीबॉडी कॉकटेल काय आहे ?

रोशे इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही सिम्पसन इमॅन्यूअल म्हणाले, या औषधाने आम्ही करोना रुग्णांमुळे हॉस्पिटलवर येत असलेला ताण आणि हेल्थकेअर सिस्टीम वरचा असह्य ताण कमी करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. कोरोनामुळे रुग्णाची तब्येत अधिक बिघडण्यापासून हे अँटीबॉडी कॉकटेल बचाव करेल. हे कॉकटेल म्हणजे CASIRIVIMAB , IMDEVIMAB असे मिश्रण आहे. हे मिश्रण व्हायरसवर एकसारखाच परिणाम करेल. भारतात रोशेच्या या अँटीबॉडी कॉकटेलला तयार करणे आणि वितरित करण्याचा अधिकार सिप्लाकडे देण्यात आला आहे.

सध्या भारतात कोरोनासाठी कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचा वापर होत आहे. याशिवाय, रशियातील व्हॅक्सीन स्पुतनिक-V देखील भारतात दाखल झाली असून, लवकरच त्याचा वापर सुरू होईल. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि WHO कडून मंजुरी मिळालेल्या जगातील सर्व व्हॅक्सीनला भारतात वापरासाठी परवानगी दिली आहे.

From Around the web