सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी CERT-In आणि Koo एकत्र ! 

 
koo

नवी  दिल्ली -  इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), भारत सरकार आणि भारताचा बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Koo यांनी संयुक्तपणे नागरिकांपर्यंत पोचायचे ठरवले आहे. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता करण्यासाठीची ही मोहिम आहे. 

हा महिना 'राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना' म्हणून साजरा केला जातो. ऑनलाईन सुरक्षा आणि सुरक्षित राहण्याची गरज याबद्दल जनजागृती करणे हा या संयुक्त मोहिमेचा हेतू आहे. त्याअंतर्गतची थीमचा आहे, 'आपला भाग,#BeCyberSmart'. सीईआरटी-इन आणि 'कू' अॅप मिळून फिशिंग, हॅकिंग, वैयक्तिक माहितीची सुरक्षा, पासवर्ड आणि पिनचे व्यवस्थापन, क्लिकबाईट टाळणे आणि सार्वजनिक वाय-फाय वापरताना एखाद्याच्या खासगीपणाचे संरक्षण यासारख्या विषयांबद्दलची जागरूकता वाढवतील.देशभरातील इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये पोहोच मजबूत करण्यासाठी Koo अॅप अनेक भारतीय भाषांमध्ये हे अभियान चालवणार आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वळवत ज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यासाठी अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातील,विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही मिळतील.

या संयुक्त मोहिमेवर अधिक प्रकाश टाकताना 'कू' अॅपचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्रमेय राधाकृष्णन म्हणाले,“भारतीयांना अनेक भाषांचा अनुभव देत एकमेकांशी जोडण्याचे सामर्थ्य देणारा एक खास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून, आम्ही काम करतो. आम्ही आमच्या युजर्सना विविध विषयांशी संबंधित महत्त्वाची माहिती देत सशक्त करण्याचा प्रयत्न करतो. सायबर सुरक्षा आणि गुप्तता या दोन गोष्टी आजचे एकमेकांशी जोडलेले जग अधिक सुरक्षित आणि सुखद बनवतात. इंटरनेट युजर्ससाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि आदर्श व्यासपीठ बनवण्याच्या 'कू'च्या अखंड प्रयत्नांचाच हा एक भाग आहे, असे आम्हाला वाटते. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करताना, सीईआरटी-इन,राष्ट्रीय नोडल एजन्सी यांच्याशी जोडून घेताना आम्हाला आनंद होत आहे.

डॉ. संजय बहल, महासंचालक, सीईआरटी-इन म्हणाले,“लोक हा सायबर सुरक्षेतला सर्वात कमकुवत दुवा आहेत. नागरिकांना सावध करत त्यांच्यामध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी, सीईआरटी-इन यंदाच्या ऑक्टोबरमध्ये 'आपलेभाग, #BeCyberSmart' या थीमसह सायबर सुरक्षा जागरूकता महिना साजरा करते आहे. याअंतर्गत,भारतातील सायबर सुरक्षा समुदायासाठी विविध नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन चालवलेल्या मोहिमा तसेच प्रशिक्षण कार्यक्रम घेतो आहोत. 

डिजिटल युगातील नागरिकांना ऑनलाइन अनुभवाचा आनंद सुरक्षितपणे घेता यावा यासाठीचा एक प्रयत्न आम्ही करतो आहोत. Koo सोबतची संयुक्त मोहिम हे या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. 

काय आहे कू? 

'कू'ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक सूक्ष्म-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, 'कू' विविध क्षेत्रांतील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त १०% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी 'कू' एक मंच मिळवून देतो.
 

From Around the web