चीनचे अनियंत्रित रॉकेट अखेर अरबी समुद्रात कोसळले

जगाने  सोडला सुटकेचा निःश्वास 
 
चीनचे अनियंत्रित रॉकेट अखेर अरबी समुद्रात कोसळले

गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचे 21 टन वजनी अनियंत्रित रॉकेट (Chinese rocket ) अखेर समुद्रात कोसळले आहे, त्यामुळे जगाने  सुटकेचा निःश्वास  सोडला आहे. 

मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या चीनच्या अनियंत्रित रॉकेटने पृथ्वीवर लँडींग केली आहे. चीनचे रॉकेट अरबी समुद्रात कोसळल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या रॉकेटचे अवशेष अरबी समुद्रात आढळले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, चीनने लॉन्ग मार्च 5बी रॉकेट 29 एप्रिलला चीनच्या हाइनान द्वीपवरुन लॉन्च केले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. पण, काही बिघाड झाल्यामुळे रॉकेट पृथ्वीच्या दिशेने अनियंत्रित होऊ निघाले. हे रॉकेट पृथ्वीच्या पृष्ठ भागावर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तवली होती. पण, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आले. त्यानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात जाऊन कोसळले.

अंतराळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. रॉकेटचे अवशेष भारत-श्रीलंकेच्या दक्षिण-पश्चिम भागात हिंदी महासागरात कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पृ्थ्वीच्या वातावरण कक्षेत शिरत असताना रॉकेटचा बहुतांशी भाग जळून खाक झाला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रॉकेटचे अवशेष मालदीवच्या हद्दीत कोसळले आहेत.

रॉकेटचा हा तुकडा जमिनीवर कोसळण्याऐवजी समुद्रात कोसळण्याची शक्यता अधिक होती. चीनचा 2021-035B हे रॉकेट १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद आहे. आतापर्यंतच्या अंदाजानुसार हे रॉकेट दक्षिण-पूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनेझुएला, दक्षिण युरोप, उत्तर किंवा मध्य आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण भारत किंवा ऑस्ट्रेलियाजवळ कोसळण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

अमेरिकेच्या अंतराळ स्थानक केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू झाला आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच हे २१ टन वजनाचे 'लाँग मार्च ५ बी' श्रेणीतील रॉकेट लाँच केले होते. अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र उभारले जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होते. मात्र, त्याआधीच नियंत्रण गमावल्याने चिंता वाढली होती.

From Around the web