दाऊद सोडाच त्याच्या नोकरालाही तुम्ही भारतात आणू शकत नाही – फारूक टकला

 
दाऊद सोडाच त्याच्या नोकरालाही तुम्ही भारतात आणू शकत नाही – फारूक टकला
मुंबई – दाऊदचा खास हस्तक फारूक टकला दाऊद इब्राहिम लांबच त्याच्या नोकरालाही तुम्ही भारतात आणू शकत नसल्याचे म्हणाला आहे. सध्या सीबीआयचे तपास पथक दुबईत अटक करुन भारतात आणलेल्या फारूक टकला याची चौकशी करीत आहे. पण टकला हा या चौकशीत सीबीआयला तपासात सहकार्य करीत नाही. स्वतःच्या प्रकृतीचा बहाणा तो करीत असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
फारूक टकला याने सुरुवातीच्या चौकशीत सांगितले की, त्याला भारतात शेवटचा श्वास घ्यायचा आहे म्हणून तो त्याच्या मर्जीने आला आहे. त्याच्या दफणविधीला त्याला मुंबईतील काही जागा हवी होती. तो दुबईत पत्नी आणि २ मुलांसह राहत होता. तिथे लपण्यासाठी तो टॅक्सी चालविण्याचे काम करीत होता. त्याचा मोठा मुलगा तेथील महाविद्यालयाचा पदवीधर असून नुकतीच त्याने नोकरी सोडली होती. तर लहान मुलगा हा सध्या पदवीचे शिक्षण घेत आहे. मुंबईत त्याचा भाऊ अहमद त्याच्या आईसोबत राहत आहे. त्याची आई सध्या खूप आजारी असल्याचेही त्याने सांगितले.

From Around the web