संमिश्र संकेतांमुळे कच्चे तेल आणि धातू घसरले

गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेची भावना
 
संमिश्र संकेतांमुळे कच्चे तेल आणि धातू घसरले

मुंबई -  एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की मंगळवारी सर्व धातू आणि ऊर्जा क्षेत्रात घसरण दिसून आल्याने गुंतवणूकदार अनिश्चित भावनेत दिसून आले. अमेरिकन महासभेकडून होणा-या प्रक्रियेत व्हायरस-रिलीफ पॅकेज ९०० अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असा अंदाज आहे. तथापि, मजबूत डॉलर आणि कोव्हिड-१९ रुग्णांच्या नव्या लाटेमुळे विशेषत: युरोपमध्ये नव्याने लागलेले निर्बंधांमुळे जागतिक गुंतवणूकदारांची भावना अनिश्चित राहिली.

कच्चे तेल: मंगळवारी, डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ४७ डॉलर प्रति बॅरलवर किंवा १.५१ टक्क्यांनी घसरले. कोरोना रुग्णांतील नव्याने वाढीमुळे बाजारात भीतीची भावना निर्माण झाली. डॉलर मजबूत झाल्याने क्रूडचे दर दबावाखाली राहिले. युरोपमधील अनेक देशांमध्ये, विशेषत: ब्रिटनमध्ये नव्या कोव्हिडच्या लाटेमुळे कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. ब्रिटनकडे जाणाऱ्या सीमा अनेक देशांनी बंद केल्या. कारण नव्या कोव्हिडचा प्रसार अधिक वेगाने होतोय, असे म्हटले जात आहे.

अमेरिकी धोरणकर्त्यांनी विषाणू मदत विधेयकावर करार करत असल्याचे दर्शवल्याने बाजारातील नुकसान मर्यादित राहिले. त्यासोबत, अमेरिकी क्रूडचे घसरलेले स्टॉक्स आणि आर्थिक स्थिती सुधारण्याविषयीचा आशावाद यामुळे मागील आठवड्यात दर वाढले. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, मागील आठवड्यात अमेरिकी क्रूड साठ्यात ३.१ दशलक्ष बॅरलची वाढ झाली. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तसेच नव्या लॉकडाऊनच्या मालिकेमुळे तेलाच्या दरांना आणखी नुकसान सहन करावे लागू शकते.

बेस मेटल्स: एलएमईवर बेस मेटले दर लाल रंगात दिसून आले. कोरोना विषाणूचा प्रसार व अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने हे परिणाम दिसले. अमेरिकेकडून होणारी आर्थिक मदत आणि लसीसंबंधीचा डाटा यामुळे औद्योगिक धातूंसाठी आशेचा किरण दिसून आला.

इंटरनॅशनल अॅल्युमिनिअम संस्थेच्या अहवालानुसार, नोव्हेंबर २०२० मध्ये जागतिक अॅल्युमिनिअम उत्पादनात ४.१ टक्क्यांनी वाढ झाली. ती ५.४७१ दशलक्ष टनांवर पोहोचले. नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरो (NBS) ने असेही सूचित केले की, नोव्हेंबर २०२० मध्ये चिनी औद्योगिक उत्पादन ७ टक्क्यांनी वाढले. साथीसंबंधी निर्बंध शिथील झाल्याने तसेच ग्राहकोपयोगी खर्चात वाढ झाल्याने चीनमधील औद्योगिक कामांना गती मिळाली.

तांबे: तांब्याचे दर १.३ टक्क्यांनी घसरले व ते ७,७४६.५ प्रति टनांवर स्थिरावले. अमेरिकी डॉलरच्या मूल्यातील वाढ आणि नजीकच्या काळात  मागणीभोवतीची भीती यामुळे तांबे लाल रंगात स्थिरावले. स इंटरनॅशनल कॉपर स्टडी ग्रुपच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरपर्यंत जातिक रिफाइन्ड कॉपर बाजारातील तूट १,५५,००० टनांवर गेली आहे. ऑगस्ट २०२० मधील ७२,००० टनांवरून तिची वृद्धी झाली. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लाल धातूचे भविष्य काहीसे लाल रंगात दिसून येईल.

From Around the web