सगळ्यांनाच आली मेड इन इंडिया 'कू' ची आठवण ! 

व्हॉट्सप, फेसबुक, इन्स्टाग्राम झाले ठप्प, युजर्सनी घेतली फिरकी
 
s
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सपचं सर्व्हर सात तासांहून अधिक काळ बंद होतं. याला आजवरचा सर्वात दीर्घ बिघाड म्हणले जाते आहे.

नवी दिल्ली  - सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सप सोमवारी रात्री सगळ्या जगभरात डाऊन झाले. त्यानंतर जगभरातल्या अनेक भागात लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र सोबतच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया आणि वैताग 'कू' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजेदार मीम्सच्या माध्यमातून व्यक्त केला.  

इंटरनेटवरच्या इतरही प्लॅटफॉर्म्सवर याविषयाच्या मीम्सचा पूर आलेला होता.  इन्स्टाग्राम, व्हॉट्सप याही फेसबुकच्याच मालकीच्या कंपन्या आहेत. भारतीय वेळेनुसार हा बिघाड रात्री ९ वाजता सुरू झाला. यानंतर असंख्य युजर्स Koo वर येत याबाबत व्यक्त होताना दिसले. एकाहून एक मजेदार मीम्स बनवत लोकांनी आपल्या विनोदबुद्धीचा प्रत्यय दिला. 'मेड इन इंडिया' असलेले Koo कधी डाऊन होत नाही आणि इतर प्लेटफॉर्म्स बंद पडतात तेव्हा लोकांना Koo ची आठवण येते. असा विविध मीम्सचा आशय होता.

या तिन्ही कंपन्या फेसबुकच्याच भागीदारीतील संरचनेत काम करतात. फेसबुक डाऊन झाल्यावर सांगितलं गेलं, की 'सॉरी, काहीतरी गडबड झाली आहे. आम्ही यावर काम करत आहोत आणि लवकरात लवकर दुरूस्ती करण्याच्या प्रयत्नात आहोत.'  

 मंगळवारी सकाळी फेसबुकने एक निवेदन काढले. यात सांगितले गेले, की फेसबुकने डेटा सेंटरमधील नेटवर्क ट्रॅफिकमध्ये समन्वय करणाऱ्या राउटरच्या कॉन्फिगरेशनमध्ये काही बदल केले होते. त्यानंतर राउटरमध्ये अडथळे निर्माण झाले. आम्ही यावर काम करत असून लवकरात लवकर ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत.' हे तिन्ही प्लॅटफॉर्म्स जवळपास ६ तास डाऊन होते. हा आजवरचा सगळ्यात दीर्घ बिघाड मानला जातो आहे.

From Around the web