वित्तीय आणि फार्मा स्टॉक्समध्ये घसरण; सेन्सेक्स ४९,५०० अंकांखाली

 
वित्तीय आणि फार्मा स्टॉक्समध्ये घसरण; सेन्सेक्स ४९,५०० अंकांखाली

मुंबई, १३ जानेवारी २०२१: बेंचमार्क निर्देशांकांनी आजच्या व्यापारी सत्रात मोठी अस्थिरता अनुभवली. आजचा बाजार वित्तीय आणि फार्मा स्टॉक्सनी मोठ्या प्रमाणावर खाली खेचला. निफ्टी अगदी थोड्या अंकांनी वधारला. तो ०.०१% किंवा १.४९ अंकांनी वधारला व १४,५०० अंकांपुढे जात १४,५६४.८५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसी सेन्सेक्स लाल रंगात स्थिरावला. तो ०.०५% किंवा २४.७९ अंकांनी घसरून ४९,४९२.३२ अंकांवर थांबला. आज जवळपास १,२०० शेअर्सनी नफा कमावला तर १,८०७ शेअर्स घसरले. तर १४३ शेअर्स स्थिर राहिले.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एमअँडएम (५.६६%), एसबीआय (४.६०%), अदानी पोर्ट्स (४.४३%), एलओसी (३.१६%) आणि एनटीपीसी (२.३५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर याउलट बजाज फायनान्स (२.९४%), एचडीएफसी (२.७५%), श्री सिमेंट्स (२.८३%), बजाज फिनर्व्ह (१.९५%) आणि युपीएल (२.०९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. फार्मा आणि वित्तीय क्षेत्र वगळता सर्व प्रमुख क्षेत्रांनी सकारात्मक कामगिरी केली.

सीईएससी लि.: कंपनीने तिस-या तिमाहीतील निकाल जारी केल्यानंतर सीईएससी कंपनीचे स्टॉक्स ३.२२% नी वाढले व त्यांनी ६८३.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा निव्वळ नफा २१.३% नी वाढला तर महसुलातही ८.३% नी वाढ झाली.

युनिकेम लॅबोरेटरीज लि.: कंपनीला ५० मिलीग्राम, १०० मिलीग्राम, २०० मिलीग्राम आणि ४०० मिलीग्रामच्या सेलेकोक्झिब कॅप्सूलसाठी यूएसएफडीएकडून एनडीए मंजुरी मिळाली. तरीही कंपनीचे स्टॉक्स १.४२% नी घसरले व त्यांनी २७४.१५ रुपयांवर व्यापार केला.

स्टेट बँक ऑफ इंडिया: एफपीआयने कंपनीमध्ये तिस-या तिमाहीत आपली भागीदारी वाढवली. म्युच्युअल फंडांनी बँकेतील त्यांची भागीदारी १२.७२ % तर एलआयसीने त्यांची शेअर होल्डिंग ९.७४% नी कमी केली. त्यानंतर एसबीआय बँकेचे शेअर्स ४.६०% नी वाढले व त्यांनी ३०५.९५ रुपयांवर व्यापार केला.

भारत रसायन्स लि.: भारत रसायनने १२ जानेवारी रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीच्या इक्विटी शेअर होल्डर्सकडून १० रुपये मूल्याचे पूर्णपणे पेड-अप इक्विटी शेअर्स पुन्हा खरेदी करण्याचा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स १.७६% नी वाढले व त्यांनी १०,५५०.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने भारतीय रुपयाने १० पैशांची उच्चांकी कामगिरी करत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.१५ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार: कोव्हिड साथीची वाढती चिंता असूनही साथीविरोधात अंतिम विजय मिळवण्याचे संकेत असल्याने जागतिक निर्देशांक आज हिरव्या रंगात स्थिरावले. एफटीएसई १०० चे शेअर्स ०.१६%, निक्केई २२५ चे शेअर्स १.०४% नी वधारले. तर एफटीएसई एमआयबी व हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.०३% आणि ०.१५% नी घसरले.

From Around the web