अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का ?

 
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का ?

सध्या भारतीय गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. कारण महागाई आणि चलन अवमूल्यनाच्या संकटात ते मदतीला येते. आता तर केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गुंतवणुकीच्या अनुशंगाने सोन्यात गुंतवणूक करावी की नाही याबद्दल विश्लेषण करीत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या.

सोनेच का?

सुरुवातीला असे म्हणता येईल की, सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वेळ चांगली किंवा वाईट नसते. सोने हा सर्वच गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचा भाग आहे. हे वैविध्य आणि संतुलनाच्या उद्देशाकरिता याचा वापर होतो. तसेच ही किफायतशीर कमोडिटीदेखील आहे. २००५ पासून, सोन्याने ७ पटींनी जास्त परतावे दिले आहेत. तर दुसरीकडे, बीएसई सेन्सेक्सने ५ पटींनी परतावे दिले आहेत. २०२० मध्ये सोन्याने सोन्यानेच २५ टक्के परतावे दिले.

आर्थिक अनिश्चिततेदरम्यानच, सोन्याचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. गुंतवणूकदाराच्या थंब रुलप्रमाणे, सोन्याला १०% वजन दिले जाते. आर्थिक अस्थैर्यात, हे वजन १५% किंवा गुंतवणूकदाराच्या निर्णयानुसार अवलंबून असते. सोने प्रत्यक्ष किंवा डिजिटली विकत घेण्याचा विषय निघतो तेव्हा गुंतवणूकदार अधिक चांगल्या पर्यायांचा आनंद घेतो. डिजिटल पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला सर्वात चांगला म्हणजे भारतीय सरकारची सोव्हेरियन गोल्ड बाँड स्कीम.यात जोखीम आणि साठवणुकीचे शुल्क नसते, तर गुंतवणूकदाराला लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्समधून सवलतही मिळते.

सध्या, जगभरातील सामाजिक-आर्थिक घटकांमुळे बाजारात अजूनही अस्थिरता कायम आहे. विशेषत: युरोप व अमेरिकेत. कोव्हिड-१९ साथीची लाट पुन्हा आल्याने बाजाराच्या गतीशीलतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सोने हा गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. काही अंदाजांनुसार, २०२१ मध्येच सोने दोन अंकी परतावे देईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील सोन्याचे वजन वाढवू इच्छित असाल, तर याचा पुन्हा विचार करा.

गुंतवणूकदाराने इतर कोणत्या पर्यायांचा विचार केला पाहिजे?

पिवळा धातू किंमतीनुसार खरोखरच उपयुक्त असतो. सध्या त्याची किंमती १० ग्राममागे ५०००० पेक्षा जास्त आहे. अशा वेळी गुंतवणूकदार चांदी विकत घेण्याचाही विचार करू शकतो. तिचा दर ६६,००० प्रति किलो एवढा आहे. तथ्यांचा विचार करता, सोन्याने मागील वर्षात २५ टक्के परतावे दिले तर चांदीने ५०टक्के. त्यामुळे चांदीदेखील गुंतवणूकदारांसाठी अधिक फायद्याची ठरू शकते.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे चांदीमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने फार पर्याय उपलब्ध नाहीत. तुम्ही ती फक्त प्रत्यक्षपणेच खरेदी करू शकतो. त्याची खरेदी आणि साठवणूकीचा मुद्दा ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

अखेरीस, सध्या चलनात असलेल्या विस्तृत आर्थिक घटकांमध्ये तुम्ही मौल्यवान धातूंना जास्त वजन दिलेच पाहिजे. सध्या अस्थिर अससलेल्या बाजारपेठेत तुमच्या पोर्टफोलिओसाठी हे संतुलन साधणारे ठरेल. त्याचवेळी त्यात गुंतवणूक करतना तुम्हाला उत्कृष्ट परताव्यांचा आनंदही मिळेल. सोने हा भारतीयांसाठी आणखी अभिमानास्पद घटक आहे. तथापि, तुम्ही या प्रतिष्ठेसाठी गुंतवणूक करणार नाहीत तर, परताव्यांसाठी गुंतरणूक करत आहात. त्यामुळे शक्य झाल्यास चांदीचा पर्याय निवडा.

From Around the web