व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असलेला भारतातील पहिला अँड्रॉइड टीव्ही लॉन्च

 टीसीएलची निर्मिती; हाय एंड हेल्दी स्मार्ट एसी ओकॅरीना सीरीज देखील केली लॉन्च
 
व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असलेला भारतातील पहिला अँड्रॉइड टीव्ही लॉन्च

मुंबई -  जागतिक टीव्ही इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनी टीसीएलने व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असणारा भारतातील पहिला अँड्रॉइड ११ टीव्ही पी ७२५ आणि ९८.६६% पेक्षा जास्त बॅक्टेरीया नष्ट करू शकणारी हाय एंड हेल्दी स्मार्ट एसीची ओकॅरीना सीरीज आज लॉन्च केली.

पी ७२५ हा पहिला ४के एचडीआर टीव्ही असून तो अँड्रॉइड ११ वर चालतो, यात व्हिडिओ कॉलची सुविधा असून, डॉल्बी व्हिजनचे अल्ट्रा व्हिव्हिड कलर्स एमईएमसी, डॉल्बी व्हिजन व अॅटमॉस, हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल २.०, स्पीड आणि सिक्युरिटी अपडेट्स इत्यादी आधुनिक सुविधांचा समावेश आहे. या टीव्हीत ७०००+ अॅप्स आणि ७००,०००+ शो/ फिल्म एकाचवेळी अॅक्सेस करता येतील.

चुंबकाने जोडलेला व्हिडिओ कॉल कॅमेरा आपल्याला सहजपणे प्लग इन आणि प्ले करता येतो. गूगल ड्युओचा वापर करून मित्र व कुटुंबासह व्हिडिओ चॅट करण्यासह, ऑनलाइन वर्गात सहभागी होणे, घरूनच आरामात ऑफिससोबत कनेक्ट होणे सहज शक्य होते. पी७२५ चे डॉल्बी व्हिजन हे आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान असून ते अविश्वसनीय ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, कलर आणि डिटेलसह अल्ट्रा-व्हिव्हिड पिक्चर क्वालिटी प्रदान करण्यासाठी वाइड कलर गॅमट क्षमतांसह हाय डायनॅमिक रेंज (एचडीआर) ला जोडते. डॉल्बी व्हिजनसह डिस्प्ले अधिक व्हिव्हिड, वास्तविक पिक्चर दाखवतो. शार्प कॉन्ट्रास्ट, ट्रू ब्लॅक व शॅडो डिटेल्सची संगती सखोल दिसून येते. अॅमेझॉनवर हा टीव्ही ४३", ५०", ५५" आणि ६५" प्रकारात अनुक्रमे ४१,९९०, ५६,९९०, ६२,९९० आणि ८९,९९० रुपये किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हेल्दी स्मार्ट एसी ओकॅरिना:

ओकॅरिना हा टीसीएलच्या आधुनिक आरोग्यआधारीत स्मार्ट एसील लाइन अपमधील एक नवी उत्पादन आहे. एअर कंडिशनरच्या नव्या रेंजमध्ये जेंटल ब्रीज, बीआयजी केअर अँड यूव्हीसी स्टरलायझेशन प्रो यांचा समावेश असून याचा बॅक्टेरिया नष्ट करण्याचा दर ९८.६६% पेक्षा जास्त आहे.

हवेच्या आउटलेटमध्ये निर्मित बायपोलर आयकॉनिक जनरेटर हवेद्वारे बॅक्टेरिया आणि व्हायरस संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा, अॅटम्स आणि मजबूत ऑक्सिकरण घटक निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. दुसरीकडे, यूव्हीसी स्टरलायझेशन, प्रोटीन आणि डीएनएला बाधा पोहोचवून बॅक्टेरिया मारण्यासाठी विकिरणचे उत्सर्जन केले जाते. तसेच हे तंत्रज्ञान ९८.६६% पेक्षा जास्त दराने बॅक्टेरिया नष्ट करते. अशा प्रकारे यूझरला व्हायरस मुक्त वातावरणात आरामात व सुरक्षित जगण्याचा आनंद मिळू शकतो.

टीसीएल होम अॅपच्या माध्यामातून गूगल असिस्टंट तसेच अॅलेक्झाच्या थेट व्हॉइस कमांडच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवता येते. हा एसी ६०% पर्यंत ऊर्जा बचतीसह एआय इन्व्हर्टर तापमान अधिक वेगाने सेट होण्यास मदत करतो. ३० सेकंदात १८०सीपर्यंत कूलिंग कॉइल व +- १ डिग्री सेल्सियससह तापमान स्थिर ठेवतो. हे एसी अशा प्रकारे तयार केले आहेत की, याद्वारे १२.५% दराने वाढणारी असेंबली साक्षरतेचा वापर करत, सहजपणे ते इन्स्टॉल करता येतात. तसेच फार मेहनत न करता ते काढूनही ठेवता येते. यात एक सहजपणे डिटॅच होणारी बॉटम प्लेट आहे. एकदा दाबल्यास, मशीनमधून सहजपणे डिसअसेंब्ली होते. डिव्हाइसमध्ये पाइपिंगसाठी एक मोठी जागा असून लीकेज झाल्यास यूझर्सना इनडोअर यूनिटची सहजपणे तपासणी करता येते.

From Around the web