कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक 
 
कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

पुणे  - महाराष्ट्र, १७ मे २०२१: एमजी मोटर इंडियाने पुण्यातील कारमालकांसोबत कोव्हिड-१९ पीडितांसाठी फंड उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. जमा झालेल्या निधीचा उपयोग रुग्णांकरिता बायोडिग्रेडेबल बेडशीट घेण्यासाठी करण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी या उपक्रमाला पाठींबा दिला व त्याचे कौतुकही केले. 

हे बेडशीट्स पीडित रुग्णांची सेवा करण्यासाठी विशेषत: पुणे आणि त्याभोवतीच्या समर्पित कोव्हिड सेंटरमध्ये वितरीत केले जातील. हे ईको फ्रेंडली बायोडिग्रेडेबल बेडशीट ४८ तासांपर्यंत वापरता येतात. एमजी कार डीलरशिप टीमसोबत एमजी कार क्लब पुणेचा भाग असलेल्या एमजी कार मालकांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

एमजी कार क्लब पुणेचे मुख्य अनुभव अधिकारी श्री प्रसाद रसने यांनी सांगितले की, 'सध्याची स्थिती लक्षात घेता निधी उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून याद्वारे बायोडिग्रेडेबल बेटशीटची व्यवस्था करण्यात आली आहे. यात सहभागी सर्व आणि एमजी कार मालकांच्या उदार योगदानाबाबत आम्ही आभारी आहोत. महामारीच्या विरुद्ध लढा देताना मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित केलेल्या गंभीर गोष्टींकडे आम्ही लक्ष देऊ असा आम्हाला विश्वास आहे.”

एमजी सेवा या कम्युनिटी सर्व्हिस छत्राखाली कारनिर्माता सध्याच्या आव्हानात्मक काळात विविध उपक्रम राबवत आहे. एमजी हेक्टर अॅम्ब्युलन्स देशाच्या सेवेतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सेवा पुरवत आहे. एप्रिल २०२१ मध्ये एमजीने गुजरातमधील देवानंदन गॅसेस प्रा. लि. सोबत भागीदारी केली आणि त्यांच्या वडोदऱ्यातील एक प्रकल्पात आठवडाभरातच ताशी १५% ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यास प्रोत्साहन दिले. लवकरच ही वृद्धी ५०% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. क्रेडिहेल्थ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करत कंपनीने नुकतेच गुरुग्राम येथील कोव्हिड-१९ रुग्णांसाठी २०० बेड्स पुरवले.

From Around the web