'नवाब ऑफ नजफगढ' वीरेंद्र सेहवाग आता कू ॲपवर !

Koo(कू इंडिया) ला ‘सर्वांत मोठं स्टेडियम’ संबोधत सेहवागनं फॅन्सना #IndiaKaSabseBadaStadium या हॅशटॅगवर आमंत्रित केले
 
d

नवी दिल्ली -  टीम इंडियाचा दिग्गज आणि लोकप्रिय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग भारताच्या सर्वात मोठ्या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म-Koo (कू) वर आला आहे. त्याने पहिल्या कूच्या माध्यमातून @VirenderSehwag हा हँडल वापरत या मंचावर आल्याची घोषणा केली.

सेहवागच्या Koo(कू) वरील आगमनाने आता कू युजरला थेट लाइव्ह मॅच पाहत असल्याचा भास होईल. शिवाय सेहवाग अनेक भाषांमध्ये संवाद साधणार आहे. विशेषत: 17 ऑक्टोबर 2021 पासून यूएई आणि ओमानमध्ये सुरू होणाऱ्या यंदाच्या टी -20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर याचं औचित्य अजूनच खास असणार आहे. सेहवाग आपल्या फलंदाजीच्या कौशल्यांसह गंमतीदार टीकाटिप्पण्या, क्रिकेट आणि इतरही ट्रेंडिंग मुद्द्यांवरच्या मार्मिक टिप्पणीसाठी ओळखला जातो. Koo ‘कू’वर दाखल झाल्यानंतर लगोलग सेहवागला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. 

d

सेहवागचे या मंचावर स्वागत करताना कूच्या प्रवक्त्याने सांगितले, “क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही. ही एक भावना आहे जी भारतीय शब्दश: जगतात. ही एक अभिव्यक्ती आहे जी आपल्या सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेला ओलांडत सर्वांना एका धाग्यात बांधते. Koo कू हासुद्धा तसाच एक बहुभाषिक मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. कू भारतीयांना त्यांच्या मातृभाषेमध्ये व्यक्त होण्यासाठी खुला अवकाश मिळवून देण्याच्या यशस्वी मोहिमेवर आहे. टी 20 विश्वचषकापूर्वी कू ॲपवर वीरेंद्र सेहवागच्या आगमनामुळे कू मराठी वरील यूजर आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये एक आगळाच उत्साह भरून वाहतोय. युजर्स आता त्यांच्या मातृभाषेत सेहवागच्या विविध मतांना, विचारांना फॉलो करू शकतील. यंदा सेहवागच्या नजरेतून पाहत ते क्रिकेटचा आनंद जरा जास्तच घेतील हे नक्की!”

काय आहे Koo(कू मराठी) :

Koo कू ची स्थापना मार्च 2020 मध्ये झाली. कू हा एक भारतीय भाषांमधला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. कू विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून विविध क्षेत्रांत कार्यरत भारतीय स्वतःला त्यांच्या मातृभाषेत इथं व्यक्त करू शकतात. ज्या देशात भारताचा फक्त 10% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जो भारतीय युजर्सना मातृभाषेचा अस्स्ल अनुभव देऊ शकेल. कू हेच काम प्रभावीपणे करत आहे. भारतीय भाषांना प्राधान्य देणाऱ्या देशाच्या नागरिकांना ‘कू’ने एक हक्काचे स्वतंत्र व्यासपीठ दिले आहे.


 

From Around the web