करोनाची लस घेतल्यानंतर नर्स पत्रकार परिषदेतच चक्कर येऊन कोसळली ( व्हिडिओ )

अमेरिकेतील घटना, लस सुरक्षित आहे का ? रोगापेक्षा इलाज भयंकर ... 
 
करोनाची लस घेतल्यानंतर नर्स पत्रकार परिषदेतच चक्कर येऊन कोसळली ( व्हिडिओ )

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लस तयारी केली आहे. अमेरिकेत आता लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र  लस घेतल्यानंतर काही जणांना  त्रास होत असल्याचे समोर आले आहे.  कोरोनाच्या लसीकरणानंतर एक नर्सची पत्रकार परिषदेतच प्रकृती बिघडली. त्यानंतर ही नर्स चक्कर येऊन कोसळली.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खरंच  कोरोनाची लस सुरक्षित आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

अमेरिकेत फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन कंपन्यांच्या लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली. सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जात आहे. शनिवारपासून लसीकरणाला सुरूवात झाली असून, काही जणांवर लसीचा दुष्परिणाम होत असल्याचे समोर आलं आहे.

अमेरिकेतील टेनेसी राज्यातील चित्तानुगा रुग्णालयात एका नर्सवर लसीचा दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. रुग्णालयात नर्स असलेल्या टिफनी डोव्हर यांना फायझर बायोएनटेकची लसीचा पहिला डोस देण्यात आला. डोस घेतल्यानंतर टिफनी या माध्यमांशी बोलत होत्या.

माध्यमांशी बोलत असताना टिफनी यांना चक्कर आल्यासारखं झालं. त्यानंतर माफ करा, मला चक्कर आल्यासारखं होतंय असं त्या म्हणाल्या. नंतर चालू लागल्या. याचवेळी अचानक तोल जाऊन त्या कोसळल्या. मात्र, आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडलं. तोपर्यंत त्या बेशुद्ध झाल्या होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

कोरोनाची लस सुरक्षित आहे का ? रोगापेक्षा  इलाज भयंकर असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे. 

From Around the web