सेहवागने 'कू'वर गाठला १ लाखाचा टप्पा

वेगाने लोकप्रिय होत आहेत अनेक क्रिकेटपटू
 
koo

नवी दिल्ली - क्रिकेट जगतातला दिग्गज आणि लोकप्रिय खेळाडू वीरेंद्र सेहवाग काही काळापूर्वीच 'कू' वर दाखल झाला. आणि पाहता-पाहता सेहवागनं १ लाख फॉलोअर्सचा टप्पाही ओलांडला आहे. 

या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर दाखल झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत सेहवागच्या खुमासदार, विनोदी कमेंट्स, गंमतीशीर टिप्पण्या यांनी अल्पावधीतच लोकांचे लक्ष वेधून घेतले. सध्या त्याचे हॅंडल @VirenderSehwag चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद आणि वाहवा मिळवते आहे. 

d

भारतीय भाषांमध्ये खुलेपणाने व्यक्त होण्यासाठीचा खुला मंच म्हणजे 'कू'. क्रिकेटचा हंगाम सुरू झाला तसे अलिकडेच अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि समालोचक 'कू'वर दाखल झाले आहेत. सोबतच यातून अॅपच्या डाउनलोड्समध्येही वेगाने वाढ झाली आहे. 

मार्च २०२० मध्ये हा प्लॅटफॉर्म लाँच झाल्यापासून केवळ २० महिन्यांच्या कालावधीत 'कू'वरच्या युजर्सची संख्या तब्बल १.५ कोटी (१५ दशलक्ष) इतकी झाली आहे. आणि यापैकी वापरकर्ते, सुमारे ५ दशलक्ष वापरकर्ते गेल्या दोन महिन्यांत या मंचावर आले आहेत. 

भारतीयांचे जगावेगळे क्रिकेटप्रेम आणि त्याचा थरार यांच्यावर स्वार होत 'कू' अजूनच वेगाने वाढते आहे. सध्या सुरू असलेली टी-२० विश्वचषक मालिका रंगेल तशी ही प्रक्रिया अजूनच गतिमान होईल, देशभरातून मिळणारा प्रतिसाद वाढेल, यात शंका नाही. 


'कू' युजर्स आणि कंटेट क्रिएटर्ससाठी आकर्षक कॅम्पेन्स आणि स्पर्धा घेऊन आले आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक हा एक अनोखा आणि हायपरलोकल अनुभव व्हावा हाच 'कू'चा प्रयत्न आहे. सेहवाग व्यतिरिक्त व्यंकटेश प्रसादसारखे आघाडीचे क्रिकेट स्टार्स, निखिल चोप्रा, सय्यद सबा करीम, पियुष चावला, हनुमा विहारी, जोगिंदर शर्मा, प्रवीण कुमार, व्हीआरव्ही सिंग, अमोल मुझुमदार, विनोद कांबळी, वसीम जाफर, आकाश चोप्रा, दीप दासगुप्ता हे सगळेसुद्धा 'कू'वर युजर्सना नियमित भेटतील. या सेलिब्रिटी क्रिकेटर्सशी कनेक्ट होण्याचा आनंद मिळवायचा असेल तर 'कू'वर सक्रिय व्हा.

यासंदर्भात बोलताना 'कू'चे प्रवक्ते म्हणाले, “वीरेंद्र सेहवागसारखा दिग्गज आमच्या मंचावर आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद वाटतो. त्यांच्या अकाऊंटने अगदीच कमी कालावधीत १ लाखाचा माइलस्टोन पार केला. कू वेगात वाढते आहे, यात शंका नाही. भारतीय लोक आपापल्या मातृभाषांमध्ये संवाद, चर्चा करण्यासाठी आवर्जून 'कू'ची निवड करत आहेत. त्यातही क्रिकेट हा तर जणू भारतीयांसाठी एक धर्म, एक जज्बा आहे. 

क्रिकेटबाबत बोलले जाते, तेव्हा लोक सोशल मिडीयात आधिकाधिक रस घेतात, हे नक्की. आमच्या या मंचाच्या माध्यमातून आता भारतीय युजर्स त्यांच्या आवडत्या खेळाडूंशी संलग्न होऊ शकतील. सोबतच आम्हाला खात्री आहे, की 'कू' हा मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म युजर्सना केवळ वर्ल्ड कप दरम्यानच नाही तर त्यानंतरही खास माहिती, मनोरंजनाची मेजनानी देत राहिल.”

From Around the web