बजेटच्या पार्श्वभूमीवर ही आहेत गुंतवणूक योग्य क्षेत्र

 
बजेटच्या पार्श्वभूमीवर ही आहेत गुंतवणूक योग्य क्षेत्र

कोव्हिड-१९ मुळे निर्माण झालेल्या मंदीतून देश सावरत आहे, हे तथ्य पाहता, २०२१ चे बजेट निश्चितच सर्वात महत्त्वाच्या बजेटपैकी एक असेल, यात शंका नाही. बजेटच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करण्यासाठी आशादायी क्षेत्रांबद्दल माहिती देताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.

वाहन क्षेत्र: कोव्हिड-१९ चे लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर वाहन क्षेत्राने आश्चर्यकारक स्वरुपात सुधारणा केली. दुचाकी वाहने, पीव्ही आणि ट्रॅक्टर्सच्या विक्रीतूनही सर्वांना धक्का बसला. मध्यम व्यावसायिक वाहन आणि जड वाणिज्य वाहन मात्र अजूनही बॅकफुटवर आहेत. २०२१ च्या बजेटकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यात एक प्रोत्साहन आधारीत स्क्रॅप पेज पॉलिसीची सुरुवातही आहे. ०१ फेब्रुवारी २०२१ मध्ये हे धोरण लागू झाले तर ठराविक कालावधीनंतर वाहने नष्ट करणे अनिवार्य होऊ शकते. त्यामुळे हलक्या आणि व्यावसायिक वाहन क्षेत्रात नव्या वाहनांची मागणी जास्त वाढेल. खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट स्टॉक्स: अशोक लेलँड आणि एस्कॉर्ट्स.

कृषी: सरकार कृषी क्षेत्रावर भर देण्याची अपेक्षा आहे. विशेषत: ग्रामीण क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांना सकारात्मक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, कृषी उपकरण आणि खत यासारख्या इतर कृष्टी इनपुट उत्पादनांच्या मागणीत वृद्धी होण्याची शक्यता आहे. या कारकांना लक्षात घेता, भारतात कृषी क्षेत्रात २०२१ मध्ये खरेदीसाठी सर्वाधिक चांगले शेअर्स आहेत. खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट स्टॉक्स: कोरोमंडल इंटरनॅशनल.

सिमेंट: २०२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणखी एक प्रमुख मुद्दा आहे. तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि हौसिंग क्षेत्र. पायाभूत सुविधांत सरकारी गुंतवणूक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिमेंट बनवणा-या कंपन्यांची कामगिरी उत्कृष्ट ठरू शकते. खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट स्टॉक्स: जे के लक्ष्मी सिमेंट.

कंझ्युमर गुड्स: उपभोक्ता खर्च कमी होत असल्यामुळे हा मुद्दा लक्ष देण्यासारखा आहे. सरकार उपभोक्ता वस्तूंची मागणी पुन्हा वाढवण्यावर भर देण्याची आशा आहे. लोकांच्या हाती अधिक पैसा राहण्याकरिता टॅक्स ब्रेक प्रदान करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. प्राप्तिकर कलम ८० क अंतर्गत कपातीची मर्यादा जुना प्राप्तिकर नियम लागू असणाऱ्या लोकांसाठी वाढवली जाऊ शकते. नव्या वैकल्पिक कर व्यवस्थेसाठी, सरकारला दरवर्षी १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची निवड होऊ शकते. हा नियम लागू झाल्यास, वाढलेल्या क्रयशक्तीमुळे उपभोक्ता वस्तूंच्या उद्योगाला प्रोत्साहन मिळू शकते. खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट स्टॉक्स: व्हर्लपूल इंडिया.

बीएफएसआय: बीएफएसआय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या व्यक्ती आणि उद्योग या दोन्हींना लोन व फायनान्स सोल्युशन प्रदान करतात, हे तथ्य लक्षात घेता २०२१ च्या बजेटनंतर त्यांच्या कर्जवहीत महत्त्वपूर्ण वृद्धी दिसून येऊ शकते. वाहन आणि हौसिंग क्षेत्रातील मागणीतील वृद्धीमुळे नजीकच्या भविष्यात बीएफएसआय कंपन्यांसाठी सकारात्मक ठरू शकते. खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट स्टॉक्स: एलआयसी हौसिंग फायनान्स.

From Around the web