अयोध्या राममंदिर भूमीच्या पायथ्यापाशी शरयूचे पाणी

अयोध्या - बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा राममंदिर उभारणीचा विषय व त्याबाबतचा निर्णय अखेर काही दिवसांपूर्वी न्यायालयाने सांगितला व पंतप्रधानांच्या हस्ते मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत राममंदिर शिलान्यासाचा कार्यक्रम तथा भूमीपूजनही पार पडले. आता अयोध्येत ज्या जागेवर भव्य-दिव्य राममंदिर उभारणार आहेत तेथे 200 फूट खाली वाळू सापडली आहे, याशिवाय गर्भगृहापासून थोडे दूर भूमीखाली शरयू नदीचे पाणी वाहताना आढल्याचे लक्षात आले आहे. आता यावर काय उपाय काढला जाईल याबाबत आयआयटीसह अन्य नामंकित संशोधन संस्था ह्या राममंदिर तेथील जमिनीवर हजार साल कसे टिकवले जाईल यावर उपाय शोधत आहेत.
दरम्यान रामजन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय याबाबत म्हणाले की, कुणी कधी याची कल्पनाही केली नसेल की भगवान श्रीरामाचे जेथे गर्भगृह होते आहे तेथील खालील जमीन ही पोकळ निघेल किंवा मजबूत ठोस अशी असणार नाही. शरयू नदी जमिनीवर वहाताना दिसत नाही परंतु ती जमिनीच्या खाली दिसते ज्या जवळ मंदिराचे गर्भगृह होत आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या संकेतस्थळावरही असे नमूद केले आहे की गर्भगृहाच्या पश्चिमेजवळ खाली शरयू नदीची प्रवाह आहे.
मंदिराच्या बांधकामाखाली मॅकशिफ्ट टेंपल बांधले गेले आहे. गर्भगृह होते तिथून मूर्ती तूर्तास काढून टाकण्यात आली आहे, कारण तेथे मंदिराचे बांधकाम सुरू करावे लागणार आहे तेथे सध्या एक सुंदर पडदा लावलाय ज्यावर मोठ्या अक्षरात जय श्रीराम लिहलेले आहे. तसेच जिकडे पूर्वी रामलल्लाच्या मूर्ती ठेवलेल्या ती जागा मंदिर निर्माणाच्या बांधकामासाठी बरोबरीत ठेवण्यात आली आहे. तेथेच मंदिराचा पाया घालण्यासाठीचे काम सुरू असताना लक्षात आले की जमिनीखाली भुरभुरीत वाळू आहे व मंदिराच्या गर्भगृहाच्या काही अंतरावर पश्चिमेला जमिनीखाली शरयू नदीचे पाणी प्रवाहित आहे.
दरम्यान रामजन्मभूमी ट्रस्टची अशी इच्छा आहे की, हे मंदिर भूकंपाचा प्रतिकार करू शकेल शिवाय 1000 वर्षांपर्यंत टिकून राहिल. म्हणूनच अशा प्रकारच्या जमिनीवर मंदिर कशा प्रकारे बांधले जावे याचे संशोधन करण्यासाठी देशातील अनेक संस्था यावर संशोधन करत आहेत. आयआय़टी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी चेन्नई, आयआयटी गुवाहटी, सीबीआयआर रूरकी, लार्सन एंड टर्बो आणि टाटा कंपनी यांचे अभियंता संशोधन कामाला लागलेले आहेत.
नीट विचार करून केलेले कामदेखील कधी चुकीचे ठरू शकत नाही म्हणून पूर्ण विचाराअंती अभियंत्यांशी सल्लामसलत करून मगच मंदिर उभारणी होणार आहे. या नवीन समस्येबाबत जरा चिंता आहे परंतु अभियंते लवकर तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे अयोध्येत राममंदिर होण्याची आम्ही वाट पहात आहोत असे राम जन्मभूमीमंदिराचे मुख्य पूजारी सत्येंद्र दास यांनी स्पष्ट केले.