सिनेरसिकांनो, जादुई जगात परत या, करन जोहरने शेअर केला लक्षवेधी व्हीडिओ

 
s

मुंबई -  बॉलिवूड मधल्या आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे करन जोहर. आपल्या रॉम-कॉम सिनेमांचा एक मोठा चाहतावर्ग निर्माण करण्यात करन यशस्वी झाला आहे. 

करनने नुकताच शेअर केलेला खास व्हीडिओ सध्या रसिकांना एक अनोखे आवाहन करतो आहे. करनच्या आगामी चित्रपटांची सुरेख झलकही यात दिसते आहे. 

नकोसा कोरोनाकाळ संपून पुन्हा जग सिनेमा बघण्यास थिएटर्समध्ये गर्दी करते आहे. हा मोलाचा क्षण साजरा करणारा हा व्हीडिओ आहे.

जग थंडावलेलं असतानाही खेळ सुरूच राहिला. रोमांच, ॲक्शन, प्रेम आणि किती काही रंगवणाऱ्या कथा तुम्ही पाहिल्या. आता हे सगळं पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे, धर्मा प्रॉडक्शनसोबत! जिथं या जादूचा अमल चालतो, तिथं आम्ही परत येतो आहोत! बॅक टू सिनेमाज!' असं koo करन जोहरने केलं आहे. 

कोरोनाच्या काळात सिनेमागृहं जवळपास दोन वर्षे बंद होती. नुकत्याच रसिकांच्या भेटीला आलेल्या ' आरआर आर', ' द काश्मीर फाईल्स' आणि 'गंगुबाई काठीयावाडी'सारख्या सिनेमांना खूपच लोकप्रियता मिळाली. आता लोक पुन्हा सिनेमागृहांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. मोठ्या पडद्याची जादू त्यांना खुणावते आहे. 

करणच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाची सध्या चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.  हा बहुचर्चित चित्रपट 9 सप्टेंबर 2022 ला प्रदर्शित होणार आहे. सोबतच त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 

From Around the web