बर्फाच्या वर्षावात दिली 'अशी' पोज, टायगर श्रॉफचे हे धाडस बघितलेत का ?

 
s

मुंबई  : टायगर श्रॉफ म्हणजे तरुणांच्या मोस्ट फेवरिट अभिनेत्यांपैकी एक. आपल्या भूमिकेसाठी कुठल्याही टोकाला जात कष्ट घेणाऱ्या नव्या पिढीच्या कलावंतांपैकी एक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख ठळक करणारे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत.यात टायगर शर्टलेस उभा आहे, तेही एकदम कडाक्याच्या थंडीत. 

'गणपत' सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचे हे फोटो आहेत. युकेमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीत टायगर चक्क शर्ट न घालता उभा आहे. कू वर त्याने पोस्ट केलेल्या या फोटोजनी अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. या फोटोजमध्ये बर्फ पडतानाही दिसतो आहे. अशावेळी शर्ट न घालता फोटो काढणे हे धाडसाचेच काम आहे.
फोटोजमध्ये टायगरसोबत जॅकी भगनानीही दिसतो आहे. फोटोला कॅप्शन देताना टायगरने जॅकीला 'बॉसमॅन' म्हणले आहे. टायगर आणि जॅकीची मैत्री जुनीच आहे.

टायगर 6 नोव्हेंबरपासून युकेमध्ये 'गणपत'चे शुटिंग करण्यात गुंतला आहे. या सिनेमात टायगर कृती सेननसोबत दिसणार आहे. 2014 मध्ये आलेल्या 'हीरोपंती' सिनेमातून या जोडीने आपला बॉलीवुड डेब्यु केला होता.

From Around the web