टायगरच्या डिसेंबर स्पेशल अदा पाहिल्यात का ?

'कू'वर पोस्ट केला खास व्हीडिओ
 
s

मुंबई : नव्या पिढीला भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे टायगर श्रॉफ. टायगरने कमावलेली शरीरयष्टी, त्याचे फायटिंग आणि डान्सिंग स्किल्स यामुळे तो प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही तो सक्रिय असतो.  

'कू' वर टायगर श्रॉफने नुकताच पोस्ट केलेला एक नवाकोरा व्हीडिओ चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या कातील अदांचे दर्शन घडवतो आहे. केवळ 10 सेकंदांच्या या व्हीडिओमध्ये टायगर समोरून चालत येतो आहे. शर्टलेस लुकमध्ये त्याने जीन्स आणि जॅकेट घातले आहे. चाहते त्याचे हावभाव आणि स्टाइलवर फिदा होत आहेत. या लहानशा व्हीडिओला त्याने कॅप्शन दिले आहे, 'चालत चालत डिसेंबरमध्ये प्रवेश करताना'

टायगरने काही दिवसांआधी आपली मॅनेजर इशा गोरक्षा हिच्यासोबतचा एक व्हीडिओही शेअर केला होता. यात तो रस्त्यावर चालता-चालता एका गाण्यावर नाचतो आहे. बाजुला इशाही त्याला प्रतिसाद देताना दिसते. हा व्हीडिओ लोकांनाही खूपच आवडला होता.

From Around the web