खय्याम यांच्या सदाबहार,अजरामर गीतमैफलीने जिंकली रसिकांची मने

मनीषा निश्चल्स महक आयोजित 'खयाल-ए-खय्याम'तून खय्याम यांना अभिवादन
 
खय्याम यांच्या सदाबहार,अजरामर गीतमैफलीने जिंकली रसिकांची मने

पुणे : चोरी चोरी कोई आए... कभी कभी मेरे दिल में... ए दिल ए नादान... चांदणी रात में... प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा... बहारो मेरा जीवन भी संभालो... फिर छिडीं रात... दिखाई दिये यु... प्रसिद्ध संगीतकार खय्याम साहेबांनी संगीताबद्ध केलेल्या सदाबहार, अवीट गीतांनी पुणेकर रसिकांची मने जिंकली. कोरोनानंतर बऱ्याच काळानंतर लाईव्ह जुनी गाणी आणि गझल ऐकायला मिळत असल्यामुळे रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

निमित्त होते, हार्मनी इव्हेंट्स प्रस्तुत, स्वरसाज निर्मित आणि मनिषा निश्चल्स महक आयोजित 'खयाल-ए-खय्याम' स्वरमैफलीचे! प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहुर खय्याम हाशमी अर्थात खय्याम यांच्या जयंतीनिमित्त 'खयाल-ए-खय्याम' स्वरमैफिलीतून त्यांना अभिवादन करण्यात आले. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही मैफल रंगली.

खय्याम यांच्या कारकिर्दीमधील प्रत्येक गाण्याची आठवण सांगत त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सादर करताना मैफिलीला रंगत आली. एकापेक्षा एक सरस अशा सदाबहार व अजरामर जुन्या गाण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी खास दाद दिली. 'ए दिल ए नादान' या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अनेक गाण्यांना रसिकांकडून 'वन्समोअर'ची होणारी मागणी गायकांना आपला कलाविष्कार फुलविण्यास प्रेरित करत होती.

गायिका मनीषा निश्चल यांच्यासह गायक गफार मोमिन, अजय राव, प्रसाद कारूळकर यांनी गायन केले. सोनी मराठी वाहिनीवरील 'सिंगिंग स्टार' या रियालिटी शोमधील वाद्यवृदांनी साथसंगत कली. त्यामध्ये अमेय ठाकूरदेसाई (तबला), प्रणव हरिदास (बासरी), सिद्धार्थ कदम (रिदम मशीन, पॕड), झंकार कानडे (कि-बोर्ड), अक्षय कावळे (कि-बोर्ड), हनुमंत रावडे (ढोलक) यांनी साथ दिली. ओघवते आणि माहितीपूर्ण निवेदन निरंजन ठाकूर यांनी केले. ध्वनीव्यवस्था आयान मोमिन, तर प्रकाशव्यवस्था विजय चेन्नुर यांनी सांभाळली.

From Around the web