लारा दत्ता शोधते आहे 'जीवनसाथी' !

 वाचा अभिनेत्रीच्या कुटुंबाची रंजक कथा...
 
s

मुंबई - लोकप्रिय अभिनेत्री लारा दत्ता सध्या आपली नवी वेबसिरीज 'हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स'मुळे चर्चेत आहे. या वेब सिरीजबाबत लोकांमध्ये बरेच कुतुहल आहे. 'हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स'चे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले असून सोशल मिडीयावर व्हायरल होते आहे. हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स भारतात नवा ओटीटी प्लेटफॉर्म लायंसगेट प्ले (Lionsgate Play) वर रिलीज होणार आहे. मात्र वासूचा भाऊ तिच्या आयुष्यात नवे रंग भरतो, तिला नव्याने नाती बनवण्यासाठी प्रेरित करतो.

 वेब सीरीज 'हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स'चा ट्रेलर पाहून म्हणता येईल की, लारा दत्ताने यात बोल्ड सीन्सही दिले आहेत. ही एक कॉमेडी फॅमिली ड्रामा वेब सीरीज आहे. या सीरिजमध्ये लारा दत्तासोबतच राजुकमार राव, प्रतीक बब्बर आणि शिनोवा सोबतच अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. वेब सिरीजमध्ये दोनों कलाकारांचे एक आगळेच कुटुंब दिसेल ज्यांचे वैयक्तिक आयुष्य खूपच अजबगजब आहे.

या कलाकारांसह दिव्या सेठ, नासर अब्दुल्ला, खालिद सिद्दीकी, म्यांग चेंग, मीरा चोपड़ा आणि आयन जोया या सिरीजमध्ये दिसतील. वेब सीरीज 'हिक्कप्स एंड हुकअप्स'चे दिग्दर्शन कुणाल कोहलीने केले आहे.

 ही सिरीज 26 नोव्हेंबरला 'लायंसगेट प्ले'वर रिलीज होईल. 'लायंसगेट प्ले'बाबत सांगायचे तर, नेटफ्लिक्स, अमेजन प्राइम वीडियो, डिज्नी+ हॉटस्टार जी5, एमएक्स प्लेयर, ऑल्ट बालाजीसारख्या डझनभर देशी-विदेशी ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये आता 'लायंसगेट प्ले'ने एन्ट्री केली आहे. 

From Around the web