नागपूरची देवयानी जोशी 'धर्मरक्षक' चित्रपटात झळकणार... 

 
नागपूरची देवयानी जोशी 'धर्मरक्षक' चित्रपटात झळकणार...

जित्याची खोड, धुरंधर आदी मालिकेत काम करणारी देवयानी जोशी लवकरच धर्मरक्षक चित्रपटात झळकणार आहे. देवयानीचा न्यूज अँकर ते चित्रपट अभिनेत्री हा  प्रवास थक्क करणारा आहे. 

ईटीव्ही ( २००८ ते १० ) साम  ( २०१४-१५ ) चॅनलमध्ये न्यूज अँकर मध्ये काम करणारी देवयानी जोशी हिने वडिलांच्या पाऊलावर पाऊल  ठेवत पुढे नाट्य क्षेत्रात  आपला ठसा उमटवला. असा नवरा नको गं  बाई, गंगा- जमूना, नवरे झाले बाबरे, हाच जावई  पाहिजे, चांदणे शिंपीत जा, दिल्या घरी सुखी राहा अश्या जवळपास ३० नाटकात काम केले. तसेच जित्याची खोड, धुरंधर  आदी तीन टीव्ही मालिकेत काम केलं आहे. 

तू तिथं असावे या चित्रपटात पाहुणी  कलाकार म्हणून काम करणारी देवयानी ही  धर्मरक्षक चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट महानुभाव पंथ ग्रँथावर आधारित आहे. त्यात देवयानी उमासा हे पात्र साकारत आहे. हा चित्रपट येत्या काही दिवसात झळकणार आहे. 

देवयानी म्हणते, नाट्य क्षेत्रांत काम करण्याची  प्रेरणा माझे वडील  मधु जोशी यांच्यापासून मिळाली. मी त्यांना बाबा म्हणते. माझे बाबा नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी रंगभूमी गाजवली आणि मलाही नाटकात काम करण्याची प्रेरणा मिळाली.  लॉकडाऊनमुळे सध्या नाटक बंद असले तरी माझी खासगी नोकरी सांभाळत नाटकात काम करत होते. नाटकात काम करण्याची संधी दिग्दर्शक सदानंद बोरकर यांच्यामुळे मिळाली. तसेच वामन केंद्रे यांनीही मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. धर्मरक्षक चित्रपटातील माझी  भूमिका लोकांना नक्कीच आवडेल, अशीही ती म्हणाली. 

From Around the web