म्युझिकच्या दुनियेचा उगवता तारा : रुद्रांश गुलाटी

मुंबई - म्युझिक व्हिडीओजच्या माध्यमातून आपला अभिनय आणि प्रतिभा सिद्ध करणाऱ्या रुद्रांश गुलाटीचे 'काला सूट' हे नवं गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतंय.गुलाटीच्या 'काला सूट' आणि 'तेरे नैना' सारख्या म्युझिक व्हिडिओंनी यूट्यूबवर प्रचंड यश मिळवलंय.
गुलाटीचे हे यश संगीताबद्दलची त्यांची सखोल जाण आणि कलेबद्दलचे समर्पण सिद्ध करते. 'तेरे नैना' गाणाने यूट्यूबवर 1 लाख व्ह्यूजचा टप्पा कधीच पार केला. या गाण्यात एक अनोखी प्रेमकथा दाखवण्यात आलीय.जिथे गुलाटी आणि हिमांशी ठकरन यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केलाय.
त्यामुळे रुद्रांश गुलाटी आणि हिमांशी ठकरनची जोडी प्रेक्षकांना भावलीय, "काला सूट" गे गाणं शुभम पांचाळ यांनी संगीतबद्ध केलंय. हाय-एनर्जी हरियाणवी हिट 'काला सूट' गाण्यात रुद्रांश गुलाटीने आपल्यातील टॅलेंट दाखवून दिलंय. त्याचा अस्सल हरयाणवी आवाज प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.
या गाण्यानंतर गुलाटी, त्याच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी सज्ज झालाय, या दमदार गाण्यानंतर तरुणाई त्याच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्यासाठी आतूर दिसतीय.त्यामुळे "काला सूट" ने गुलाटीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा नव्याने रोवला गेला आहे.