सलमान खान आता ‘चिंगारी’चा ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार !

 
सलमान खान आता ‘चिंगारी’चा ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार !

मुंबई : चिंगारी या भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मीडिया सुपर एंटरटेनमेंट अॅपने सलमान खानचे नाव ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार म्हणून जाहीर केले. सलमान खान भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित अभिनेता तसेच बॉक्स ऑफिसवरील बेताज बादशाह आहे.

चिंगारी अॅपचे सह संस्थापक आणि सीईओ सुमित घोष म्हणाले, “ चिंगारीसाठी ही खरोखरच खूप महत्त्वाची भागीदारी आहे. चिंगारी अॅप भारतातील प्रत्येक राज्यापर्यंत पोहोचवण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे सलमान खान आमचा ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूदार लाभल्यामुळे ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. या भागीदारीतून नजीकच्या भविष्यात चिंगारीला आणखी नवी शिखरे गाठण्याची ताकद मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

या भागीदारीबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला, “ चिंगारी हे भारतातील सर्वात लोकप्रिय मनोरंजन अॅपपैकी एक आहे. यूझर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना प्रोत्साहन देण्याकरिता या अॅपने कार्य केले आहे. चिंगारीने एवढ्या कमी वेळात ही उंची गाठली, ग्रामीणपासून शहरी भागापर्यंत कोट्यवधी लोकांना त्यांची अनोखी प्रतिभा सादर करण्याकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. येत्या काही दिवसात अॅपचे प्रेक्षक आणखी काही करोडोंनी वाढतील.”

चिंगारी अॅपचे सह संस्थापक आणि सीओओ दीपक साळवी म्हणाले, “ सलमान खानच्या लोकप्रियतेमुळे आमच्या प्लॅटफॉर्मवर आणखी यूझर्स वाढण्यास मदत होईल. चिंगारीने नेहमीच कंटेंट क्रिएटर्सना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. संपूर्ण भारतातील यूझर्सना अद्ययावत व दमदार सुविधांद्वारे अधिक रंजक सामग्री निर्माण करण्यास प्रोत्साहीत करण्याच्या धोरणानुसार, कंपनीची वाटचाल सुरु आहे ”

चिंगारी अॅपचे सह संस्थापक आणि सीएसओ आदित्य कोठारी म्हणाले, “देशाची नाडी ओळखणारा ब्रँड अॅम्बेसेडर आम्हाला हवा होता. ही सर्व वैशिष्ट्ये सलमान खानमध्ये आहेत आणि तो संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. यापेक्षा आणखी चांगला चेहरा ब्रँडला मिळू शकत नाही. भविष्याविषयी सांगायचे झाल्यास, यूझर्सना यूनिक कंटेंट तयार करण्यासाठी आणखी चांगले टूल्स उपलब्ध करून देण्याचा चिंगारीचा उद्देश आहे.”

डिसेंबर २०२० पर्यंत चिंगारीने भारत आणि जगभरात आपल्या ब्लू-चिप बॅकर्सद्वारे १.४ मिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी जमवला होता. चिंगारीच्या गुंतवणूकदारांमध्ये एंजेल लिस्ट, आयसीड, व्हिलेज ग्लोबल, ब्लूम फाउंडर्स फंड, जसमिंदर सिंह गुलाटी आणि इतर प्रमुख नावांचे प्रतिष्ठित गुंतवणूक समूह आहेत. चिंगारीने ऑनमोबाइलच्या नेतृत्वात नुकतेच १३ मिलियन अमेरिकन डॉलर फंडिंगची एक नवी फेरी केली. यात भाग घेणाऱ्या इतर गुंतवणूकदरांमध्ये रिपब्लिक लॅब्स यूएस, अॅस्ट्रॅक व्हेंचर्स, व्हाइट स्टार कॅपिटल, इंडिया टीव्ही (रजत शर्मा), जेपीआयएन व्हेंचर्स कॅटॅलिस्ट्स लिमिटेड, प्रोफिटबोर्ड व्हेंचर्स आणि यूकेतील काही मोठ्या फॅमिली ऑफिस फंड्सचा समावेश आहे.

From Around the web