साडीबाबत काय म्हणाली अर्चना पूरन सिंग

कू वर फोटोसह व्यक्त केल्या भावना
 
dee

मुंबई, : अभिनेत्री अर्चना पूरन सिंग इन्स्टासह कूवरही सक्रीय असते. आपल्या कामाविषयी फोटो आणि व्हिडीओज टाकण्यासह अर्चना खासगी आयुष्यातले निवडक क्षणही चाहत्यांसह 'कू'वरशेअर करत असते. 

d

आताही अर्चनाने कपिल शर्मा शोमधले काही खास फोटोज 'कू'वर शेअर केले आहेत. या फोटोजचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात अर्चनाने साडी नेसली आहे. अर्चनाच्या साडीवर फ्लोरल प्रिंट सारी लूक अतिशय फ्रेश दिसतो आहे. कूवर पोस्ट करताना अर्चनाने लिहिले आहे, "आपला भारतीय पेहराव! दीर्घ काळानंतर साडीचं सौंदर्य मी पुन्हा अनुभवलं. 'द कपिल शर्मा शो'मध्ये. कालच्या शोमध्ये सनी देओल आणि त्यांचे पुत्र करन देओल हे दोघे पाहुणे होते."  #WorkWednesday #Koooftheday #Koo #KooKiyaKya #KooIndia असे हॅशटॅग्जही अर्चनाने पोस्टसोबत वापरले आहेत.  

'द कपिल शर्मा शो'मध्ये जज म्हणून दिसणारी अर्चना तिच्या विनोदी आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. अर्चनाने नुकतीच मेन्स डेनिमित्त केलेली पोस्ट खूप व्हायरल झाली होती. यात तिने आपली दोन मुले आणि पती यांच्यासह सर्व प्रेमळ व संवेदनशील पुरूषांना अतिशय सुंदर शब्दात पुरूष दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 


 

From Around the web