ट्रक-कारचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

 
ट्रक-कारचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू
पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोरजवळील कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर मध्यरात्री ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीजवळ ही घटना घडली. हा अपघात एकढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत.


ट्रक-कारचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू
मृतांमध्ये अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महंमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव व जुबेर अजित मुलाणी यांचा समावेश आहे. अपघातानंतर यवतवर शोककळा पसरली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. हे सर्वजण शुक्रवारी सकाळी रायगड जिल्ह्यात फिरायला गेले होते. रायगडावरून परत येत असताना कदम वाक वस्ती या गावाजवळ गाडी चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये अर्टिगा कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.


मृतकांमधील दत्ता गणेश यादव हा हडपसर ( उंड्री) भागातील JSPMS महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा विश्वराज हॉस्पिटलमध्ये बाऊन्सरचे काम करायचाय तर विशाल सुभाष यादव हा वाघोली गावातील JSPMS महाविद्यालयात शिकत होता. शुभम भिसे हा उरळी कांचन जवळील कासुर्डी गावातील महात्मा गांधी महाविद्यालयात BCS चे शिक्षण घेत होता तर अक्षय चंद्रकांत दिघे हा हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात BSC च्या शेवटच्या वर्षाला होता.

नुर मोहम्मद दारा हा लोणी काळभोर मधील महाविद्यालयात बी एच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. परवेज अशपाक आत्तार आझम कॅपसमधील पुणा कॉलेजमधे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अक्षय वायकरचा स्वत:चा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता तर जुबेर मुलाणी हा लोणी काळभोर जवळ नोकरी करत होता.From Around the web