बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमेसाठी आता बंजारा महिलाही सज्ज

 
बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमेसाठी आता बंजारा महिलाही सज्ज
भारत सरकार राबवित असलेल्या बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमेत बरेच भारतीय नागरीक, सामाजिक संस्था, चित्रपट क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ, उद्योजक उत्स्फूर्तपणे सहभागी होत अाहेत. त्यात चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका अनिता राठोड ह्यांच्या समवेत आता बंजारा महिलांनीसूद्धा प्रचंड संख्येत सहभागी होऊन समाजासाठी आदर्श निर्माण केलाय.

बॉलीवूड दिग्दर्शक राजीव वालिया ह्यांच्या कल्पनेतून त्यांच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या "बेटी बचाव बेटी पढाओ" ह्या व्हिडीओ अल्बम गाण्यात भारतातील नामवंत प्रतिष्ठीत व्यक्ती, सौ अमृता फडणविस, निता अंबानी,सायना नेहवाल, विद्या बालन, मेरी कौम,रवीना टंडन, जया प्रदा, तमन्ना भाटीया,शिल्पा शेट्टी, किरण खेर, सूमन राव, पलक मूंचल, श्रेया घोशाल, शाल्मली खोलगडे, निती मोहन समवेत आता शांतीदूत प्रॉडक्शन्स च्या निर्मात्या मिसेस ग्लोबल वर्ल्ड अनिता राठोड ह्यासूद्धा झळकणार असून त्यांच्या समवेत मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील इंदिरानगर तांडा व जवळपासचे अनेक तांड्यातील 500 बंजारा महिला व मूलींनी ह्यात अभिनय केला आहे. ह्या गाण्याचे वमोचन प्रतीष्ठीत मान्यवरांच्या हस्ते करणार असून संपूर्ण जगभर ह्याचे प्रसारण व प्रचार करण्यात येणार आहे.

From Around the web