लग्न नाकारल्यानं प्रेयसीनं केली प्रियकराची हत्या

 
लग्न नाकारल्यानं प्रेयसीनं केली प्रियकराची हत्या
एका प्रेयसीनं प्रियकरांची हत्या केल्याची धक्कादायक  घटना  पुण्यात ील गामीण भागात झाली  आहे. पुणे शहरातील नऱ्हे भागातील सिंहगड पोलीस ठाण्यात  सदर  महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीनं भररस्त्यात प्रियकाराच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार केले. यानंतर तरुणाचा जागीच मृत्यू झाला  असल्याचे समजते .

प्रियकराची हत्या केल्यानंतर तरुणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत सिंहगड पोलीस ठाण्यात गेली आणि तेथे तिने आपला गुन्हा कबूल केला.पहाटे साधारण  4.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार नऱ्हे गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महंतेश बिराजगार (वय  27) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अनिता वय   वर्ष  25 (नाव बदललेले आहे) हिने आपल्या प्रियकराचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनिता हिला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार ,  अनिता ही पहाटेच्या सुमारास रक्ताने माखलेल्या अवस्थेत व हातात कोयता घेऊन सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल झाली. यावेळी तिने  'मी माझ्या प्रियकराचा खून केलाअसे सांगितलेयानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनिता हिला ताब्यात घेतले असून  घटनेबाबतचा  पुढील तपास सुरू आहे.  

From Around the web