उरूळी देवाची धरणातील पाण्याचे जल पूजन

 


उरूळी देवाची  धरणातील पाण्याचे जल पूजन
उरूळी देवाची ( अंबादास गोरे ) - उरूळी देवाची (शेवाळेवाडी ) येथील धरण परवाच्या पावसाने प्रथमच तुडूंब भरले होते.
आज घटस्थापनेचा मुहूर्त साधून भ्रष्टाचार निर्मूलन जन संघटना व जेष्ठ नागरिक सेवा संघ याच्या वतीने "जलपुजन" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी घटस्थापनेचा दिवस असल्याने व कित्येक वर्षांपासून प्रथमच हे धरण भरल्याने गावकरी नागरिक पदाधिकारी याच्यात उत्साह आनंद दिसत आहे.

या धरणामुळे शेवाळेवाडी, उरूळी देवाची, फुरसुंगी या परिसरात शेतीसाठी पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
संघटनेच्या वतीने 2016 साली या धरणातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे मुळ पाणी साठ्या या पेक्षा कित्येक पटीत पाणीसाठ्यात वाढ झाली .

या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दिलीप तात्या भाडळे-पाटील, उपसरपंच तात्यासाहेब भाडळे-पाटील, सरपंच उल्हास शेठ शेवाळे, श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे-पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष सोनाई उद्योग समूहाचे रमेश आप्पा भाडळे-पाटील,उद्योजक शंकरशेठ भाडळे-पाटील, युवराज भाडळे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते शंकर भाडळे-पाटील,संघटनेचे सदस्य ज्ञानेश्वर राजमाने, बर्डे साहेब,तुळजापूर तालुका सदस्य तात्यासाहेब कोळेकर,  जेष्ठ नागरिक सेवा संघ सदस्य राधिका हाॅटेल चे मालक ओस्वाल आदि मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी उपसंरपच तात्यासाहेब भाडळे-पाटील आपले मनोगत व्यक्त केले.


From Around the web