पाच उद्योगसमूहांच्या सीएसआर खात्यांवर होता हॅकर्सचा डोळा

राजेश शर्मा, परमजितसिंग संधू यांची पोलिसांकडून चाैकशी
 
पाच उद्योगसमूहांच्या सीएसआर खात्यांवर होता हॅकर्सचा डोळा

पुणे -  बँकांतील डॉरमंट खाते (निष्क्रिय खाती) गाेपनीय माहितीच्या डेटा लीक प्रकरणात अाराेपींनी पाच काॅर्पाेरेट बँक खाती लक्ष्य केली हाेती. यामध्ये देशातील व परदेशातील काॅर्पेरेट हाऊसच्या सीएसअार बँक खात्याचा समावेश असून एका बँक खात्यात तब्बल १०० काेटींपेक्षा जास्त रक्कम पाेलिसांना तपासात आढळून अाली अाहे. व्यवसायात नुकसान झाल्यामुळे काेट्यवधी रुपयांची देणी चुकती करण्यासाठी अनघा माेडक हिने गुजरातमधील सुरतचा रहिवासी वरुण वर्मा अाणि हैदराबाद येथील राजशेखर ममिडी यांच्यासाेबत कट रचल्याचे स्पष्ट झाले अाहे.

राजशेखर अाणि वरुण यांनी मुख्यत: निष्क्रिय अाणि काही सक्रिय बँक खात्यांची गाेपनीय माहिती बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने मिळवली हाेती. त्याच्या संगणकाचे स्क्रीनशाॅट घेऊन व त्यांनी ते विक्री करून काेट्यवधी रुपये हस्तांतरित करून कमिशन मिळवण्याचे ठरवले. त्यानुसार अनघा माेडक हिच्याशी त्यांनी संपर्क साधला अाणि डाटा विकत घेणारे लाेक शाेधण्यास सांगितले. अनघा हिचे बीएस्सी, एमबीए फायनान्स शिक्षण झाले असून ती स्टाॅक ब्राेकर म्हणून काम करते. काेराेनाच्या काळात व्यवसायात नुकसान झाल्याने काेट्यवधी रुपयांची देणी तिला परतफेड करायची हाेती. यासाठी तिने संबंधित डेटा मिळवून बँक खाती हॅक करून सायबरतज्ञांच्या साहाय्याने डॉरमंट खात्याच्या माहितीद्वारे पैसे दुसऱ्या खात्यात वळवण्याचे ठरवले. त्यानुसार ती सायबर हॅकर्सच्या शाेधत हाेती. याबाबतची कुणकुण सायबर पाेलिसांना मिळाल्यानंतर पाेलिस तिच्या संपर्कात हॅकर्सच्या रूपात अाले व त्यांनी इत्थंभूत माहिती मिळवण्यास सुरुवात केली.

गुजरात, हैदराबादचे अाराेपी अाले पुण्यात : या गुन्ह्यात तिला सुरतवरून वरुण अाणि हैदराबाद येथून राजेश्वर पैसे मिळाले का? अशी विचारणा करत हाेते. त्याबाबतचा संदेश तिला अाल्यानंतर अनघाने २५ लाख रुपयांच्या पैशाचा फाेटाे दाेघांना पाठवल्यानंतर ते स्वत:हून पुण्यात दाखल झाले अाणि पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. अाैरंगाबाद येथील विशाल बेंद्रे हा अायटी इंजिनिअर अनघाच्या संपर्कात हाेता. फेसबुक, व्हाॅट्सअॅप अाेळखीतून अनघा अाणि राेहन मंकणी यांची अाेळख त्याने करवून दिली. त्यानंतर मंकणी या गुन्ह्यात अडकला. रवींद्र माशाळकर, अात्माराम कदम व वरुण वर्मा हे तिघे गुडगाव येथे एका कंपनीत कामास असल्याने त्यांची अाेळख झाली हाेती. सदर अाराेपींनी ज्या पाच बँक खात्यांची माहिती मिळवली हाेती त्या बँक खातेधारकांचा जबाब पाेलिस नाेंदवून घेणार अाहेत.

राजेश शर्मा, परमजितसिंग संधू यांची पोलिसांकडून चाैकशी

रवींद्र माशाळकर, राजशेखर ममिडी व विशाल बेंद्रे यांनी हैदराबाद येथील साेनू व गुजरात वापीतील दीपकसिंग ऊर्फ अजय यांच्यासोबत गुन्ह्याचा कट रचला. वेगवेगळ्या बँकेच्या डाॅरमंट खात्यांची माहिती हॅक करून ती चाेरली. डाॅरमंट खात्यातील रक्कम परस्पर काढण्याचा कट राेहन मंकणी, अात्माराम कदम, वरुण वर्मा, विकासचंद यादव, सुधीर भटेवरा, राजेश शर्मा, परमजितसिंग संधू, अनघा माेडक यांच्या साहाय्याने रचला. मंकणी, शर्मा व संधू हे डेटा विकत घेऊन स्वतःच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करून घेणार होते. शर्मा, संधू आणि मोडक यांना बुधवारी अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात काही बँक अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

शर्मा, संधू अनघाला देणार होते २५ लाख रुपये

अाैरंगाबादचे राजेश शर्मा अाणि परमजितसिंग संधू व राेहन मंकणी अनघाच्या संपर्कात अाल्याचे स्पष्ट झाले. दाेघांना डेटा विक्री करून त्यांच्या बँक खात्यांवर पैसे हस्तांतरित करण्याची याेजना अाखण्यात अाली. अनघाने अडीच काेटी रुपये राेख देण्याची मागणी शर्मा व संधू यांच्याकडे केली. मात्र, दाेघांचे चॅनलच्या व्यवसायात नुकसान झाल्याने त्यांनी २५ लाख रुपये देऊ शकताे असे सांगितले. दाेघांनी पैशाची जुळवाजुळव करून रक्कम माेडकला देण्यासाठी पुणे गाठले. सुधीर भटेवरा स्टाॅक ब्राेकर कार्यालयाबाहेर पैसे घेण्यासाठी थांबला असता तिघांना ताब्यात घेण्यात आले.

काही बँक अधिकाऱ्यांचाही समावेश ?

बँक खाती हॅक करून २१६ काेटी ३९ लाख ३४ हजार रुपये इतर खात्यांवर वळवण्याचा कट पुणे सायबर पाेलिसांनी मंगळवारी उघडकीस अाणला. याप्रकरणी हैदराबाद, अाैरंगाबाद, गुजरात, मुंबई, लातूर अादी पाच ठिकाणी पाेलिसांची पथके तपासकामी रवाना करण्यात अाली असून एकूण १३ पथके या गुन्ह्याचा तपास करत आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आठ जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर राजेश शर्मा, परमजितसिंग संधूसह एकाला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

From Around the web